Wednesday, 22 December 2021

२२ डिसेंबर : वर्षातील सर्वात लहान दिवस

आज २२ डिसेंबर ! वर्षातील सर्वात लहान दिवस !


२२ डिसेंबर रोजी सुर्य जास्त दक्षिणेकडे असतो. या बिंदूला 'विंटर सोल्सस्टाईल' असे म्हणतात. या बिंदूवर सुर्य असताना हा दिवस वर्षातील सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र ठरते.

 

आजच्या दिवसाचा सूर्यास्त पाहण्यासाठी समुद्र किनारी जगभरातील लोकं गर्दी करतात आणि वर्षातील मोठी समजल्या जाणाऱ्या रात्रीचे स्वागत करतात.


याच दिवशी समुद्रावर सूर्यास्त पाहण्यासाठी भरपूर लोकांची गर्दी पाहायला मिळते. रात्रीची गुलाबी थंडीची मजा घेत फेरफटका मारण्याचे बेत अनेकांनी आखलेले असतात.


ग्रेगरी दिनदर्शिकेत २२ डिसेंबर हा वर्षातील ३५५वा किंवा लीप वर्षात ३५६वा दिवस असतो. हा उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस असून रात्र सर्वात मोठी असते.


आजपासून सूर्य उत्तर गोलार्धात प्रवेश करतो. सूर्याचे उत्तरायण सुरू होते. आजच्या दिवसाचे आणखी एक खास वैशिष्ट्य आहे.


वास्तविक पृथ्वीच्या सू्र्यापासूनच्या अंतरात कायम होणाऱ्या बदलांमुळे हा फरक पडत असतो. पृथ्वी ही कायम सूर्याच्या बाजूने थोडीशी कललेली असते. त्यामुळे बारकाईने निरीक्षण केल्यास वर्षातल्या प्रत्येक दिवशी सूर्याची उगवण्याची जागा किंचित बदलत असते. 


२२ डिसेंबरला सूर्याचं दक्षिणायण संपून उत्तरायण सुरु होतं. याचा अर्थ सूर्याची किरणं पृथ्वीवर सर्वाधिक तिरपी पोहोचत असतात आणि पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात ती जवळपास सरळ पडतात. 


त्यामुळे पृथ्वीच्या इतर भागात दिवस खूप लहान होतो आणि रात्र मोठी होते. त्यानंतर लगेचच सूर्याचं उत्तरायण सुरु होतं. याचाच अर्थ पृथ्वी स्वत:भोवती फिरता फिरता हळूहळू दक्षिणेकडे कलू लागते.


याचाच परिणाम म्हणून २२ मार्च आणि २२ सप्टेंबर या दोन दिवशी दिवस आणि रात्र हे समान म्हणजेच १२ तासांचे असतात.





No comments:

Post a Comment

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....