Friday, 25 June 2021

लोकराजा शाहू जयंती

आज २६ जून,  महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत, बहुजनांचे तारणहार, समाजसुधारक दूरदृष्टी असणारे राजमान्य राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती.

लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची जयंती राज्यभर उत्साहात साजरी केली जाते. समाजाला समान संधीचे मूलभूत हक्क मिळवून देणाऱ्या छत्रपती #शाहूमहाराज यांची जयंती म्हणजे #सामाजिकन्यायदिन.

शेती ही पारंपरिक पद्धतीने न करता आधुनिक पद्धतीने करावयास पाहिजे असे राजर्षी #शाहूमहाराजांचे मत होते.  शेतकऱ्यांचे पावसाच्या पाण्यावरचे परावलंबित्व दूर करुन शेती खात्रीची व्हावी, यासाठी लक्ष्मीबाई तलावाचे काम त्यांनी हाती घेत इतरही वीस तलाव त्यांनी बांधले.

राजर्षि शाहू महाराज यांनी शिक्षकांसाठी प्रशिक्षण आणि मेरिट प्रमोशन ही योजना सुरू केली. शिक्षक प्रशिक्षणासाठी सहा महिने मुदतीचे प्रशिक्षण वर्ग सुरू केले. त्यासाठी शिक्षकांना निमपगारी रजेची तरतूद केली. 

छत्रपती #शाहूमहाराज यांनी सन १९०२ मध्ये कोल्हापूर संस्थानातील ५० टक्के शासकीय नोकऱ्या मागासलेल्या वर्गासाठी राखीव ठेवण्याचा जाहीरनामा काढला. मागासवर्गासाठी राखीव जागांचे धोरण अमलात आणणारे #शाहूमहाराज हे भारतातील पहिले राज्यकर्ते होत.

छत्रपती #शाहूमहाराज यांनी अस्पृश्यतेच्या उच्चाटनासाठी कृतिशील प्रयत्न केले. शाळा, पाणवठे, विहिरी, कचेऱ्या इ. सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाळण्यास कायद्याने प्रतिबंध केला. अस्पृश्यांना सरकारी नोकरीत घेतले, तलाठ्यासारख्या प्रतिष्ठेच्या जागा दिल्या.

छत्रपती #शाहूमहाराज यांनी गुन्हेगार समजल्या गेलेल्या जातींची हजेरी पद्धतीतून मुक्तता केली. फासेपारधी, कोरवी, माकडवाले यांसारख्या भटक्या व विमुक्त जातींचे जीवन स्थिर केले. बलुतेदारांना बलुतेपद्धतीतून मुक्त करून त्यांना सर्व उद्योगधंदे खुले केले.

करवीर राज्याचे उत्पन्न कमी असल्याने नोकरशाहीच्या हातून शाहू महाराजांनी सत्तासूत्रे आपल्या हाती घेऊन प्रशासन यंत्रणेवर वचक बसविण्यासाठी ‘हुजूर कार्यालयाची’ स्थापना केली. महाराजांची ही कृती म्हणजे नोकरशाहीच्या मक्तेदारीला लावलेला सुरूंगच होता. 

‘कुस्तीची पंढरी’ कोल्हापूरला बनविण्याचे श्रेय हे केवळ राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनाच जाते म्हणजे कोल्हापूरच्या मातीत ‘मल्लविद्या’ रुजविण्याचे, जोपासण्याचे व वाढविण्याचे काम त्यांनी केले. १८९५ साली ‘मोतीबाग तालीम’ची स्थापना केली त्या ठिकाणी प्रवेशव्दारावर एक पाटीवर लिहीले होते,‘पहिली शरीरसंपत्ती दुसरी पूत्रसंपत्ती व तिसरी धनसंपत्ती असेल तोच पुण्यवान’ म्हणजे महाराजांचे क्रिडा क्षेत्राविषयीची आस्था येथे दिसते.

शाहू महाराज कुठल्याही जातीधर्मापुरते अथवा राज्यापुरते मर्यादीत नव्हते तर ते  नुसता नव्या युगातील सर्वांगपूर्ण #राष्ट्रपुरुष होते. ते महाराष्ट्राच्या विकासाचा स्वाभाविक तरंग होते.

अशा थोर लोकराजा राजर्षी शाहु महाराजांना जयंती निमित्त अभिवादन व मानाचा मुजरा.....🙏💐🚩

#लोकराजाशाहू
#सामाजिकन्यायदिन

No comments:

Post a Comment

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....