१७ जून :- महाराणी लक्ष्मीबाई बलिदान दिन
चमक उठी सन सत्तावन में,
वह तलवार पुरानी थी...
खूब लड़ी मर्दानी वह तो,
झांसी वाली रानी थी....
ग्वाल्हेरच्या मुरार छावणी युध्दानंतर महाराणी लक्ष्मीबाई यांनी १७ जून १८५८ ला पुरूषी वेश धारण केले. आवडत्या निळा रंगाचा मखमली कुर्ता घातला, गळ्यात मोत्यांची माळ, डोक्यावर निळा चंदेरी साफा आणि रत्नजडित तलवार घेऊन कोटा की सराय येथे युध्दास रवाना झाल्या.
आपल्या दत्तकपुत्रास रामचंद्रराव व काशीबाईकडे सोपविले. आणि शिंदेच्या अश्वशाळेतून नविन घोडा घेऊन रणांगणात मर्दानी सारख्या लढायला गेल्या. १७ जूनला सकाळी ह्यु रोज आपल्या सोबत ८ वी हुज़र सेना, १४ वी ड्रायगन सेना, ९५ वीं रेजिमेंट, कालपी बटालियन, हैद्राबाद रेजिमेंट, १ बॉम्बे लांसर, बॉम्बे लांसर कॅवलरी रेजिमेंट आणि ८ वी हुज़र सेना अश्या विविध सेना घेऊन ब्रिगेडियर स्मिथ, कॅप्टन गॉल, कर्नल ब्लॅक, ले.कर्नल रेस, मीड, लॉक, हीथ असे मोठे ब्रिटिश अधिकाऱ्यांना घेऊन सकाळी सात वाजता कोटा की सराय येथे पोहचला.
महाराणी सोबत मुख्य सहकारी गुलमोहम्मद, तात्या टोपे, बांदाचे नवाब, गणपतराव मराठे, महिला दुर्गादल कंमाडर जूही, मुंदर, ललिताबाई बक्शी, मालतीबाई लोधी आणि सात ते आठ हजार मराठा व पठान सेना होती. ह्या सर्वांनी मिळून इंग्रजांना सळो की पळो केले.
युध्दाच्या शेवटच्या चरणात इंग्राजंची सेना भारतीय क्रांतीकाऱ्यांवर भारी पडू लागली. सगळे क्रांतीकारी कोटा की सराय येथून फुलबागकडे निघाले. महाराणी लक्ष्मीबाई स्वर्ण रेखा नदी पार करून निघाल्या. तेवढ्यात मुंरच्या छातीत गोळी लागली. आणि बाईसाहेब असे ओरडून धारातीर्थी पडली. महाराणी लक्ष्मीबाई पुन्हा नदी पार करीत कोटा की सराय येथे आल्या. मुंदरच्या मारेकऱ्यांना महाराणीने ठार केले. आणि नदी पार करण्यास निघाल्या. त्या वेळी नदीला पाणी खुप होते. आता मात्र घोडा नदी पार करेना. तेवढ्या एका इंग्रज सैनिकाने राणीच्या छातीत गोळी मारली. आणि डोक्यात तलवारीचा घाव घातला. तलवारीच्या घावामुळे राणीचे डोके फुटले वह डावा डोळा बाहेर आला.
इंग्रज सैनिकाला यमसदनी पाठवून कसेबसे नदी पार करीत फुलबागे पोहचल्या. गुल मोहम्मद बेशुध्द रक्तबंबाळ राणीला घेऊन जवळच असलेल्या बाबा गंगादास यांच्या मठात नेले. राणीवर उपचार सुरू झाले. परंतू राणीची प्रकृती चिंताजनक होती. चंदेरी साफा, तलवार दामोदररावाला देत राणीने आपल्या पार्थीवाला इंग्रज हात लावता कामा नये अशी शेवटची इच्छा व्यक्त करत "हर हर महादेव" ची घोषणा देत राणी स्वर्गसिधार गेल्या.
बाबा गंगादास यांनी मठातल्या झोपडीत राणीचे अंतिम कार्य केले. तेवढ्यात इंग्रजांचा हल्ला झाला. अंतिम कार्यात विघ्न नको म्हणून मठातील उपस्थित १२०० साधूंपैकी ७४५ साधू इंग्राजांशी लढत होते. एकीकडे युध्द तर दुसरीकडे राणीची चिता जळत होती. रात्रभर तुंबळ युध्द सुरू होते. ह्या वेळेस साधूंनी एका तोफेने हल्ला केला. कालांतराने ह्या तोफेला राणी झाँसी तोफ असे नाव दिले. आज ह्या तोफेने जयंती व पुण्यतिथीला राणीसाहेबांना मानाचा सलाम दिला जातो. राणीच्या पार्थिवाचीयव रक्षा करताना ७४५ साधूंनी आपल्या प्राणांची आहुती दिली.
१८ जूनच्या सकाळी ह्यु रोज मठात शिरला त्याला. त्याला साधूंचे मृत देह व एक शमलेली चिता दिसली. शिंदेच्या सेवकाने राणी लक्ष्मीबाईंची चिता असल्याचे सुचविले. तरी इंग्रज राणीच्या मृत्युची पुष्टी करण्यासाठी संपूर्ण दिवस भर ग्वाल्हेर मध्ये शोध मोहीम सुरू केली. पण काही हाती लागले नाही. शेवटी १९ जूनला वर्तमान पेपर आणि इतर साधनांद्वारे १८ जून राणी लक्ष्मीबाईंच्या मृत्युची घोषणा केली.
अश्या प्रकारे भारत भर महाराणीची पुण्यतिथी १८ जून समजली गेली.
भारत मातेच्या बलिवेदीवर आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या झाशीच्या पराक्रमी राणी लक्ष्मीबाई यांना कोटी कोटी अभिवादन व मानाचा मुजरा.
- रितेश ठाकूर
स्वातंत्र्यलक्ष्मी बुंदेलखंड धराधरीश्वरी राजराजेश्वरी झाशीची राणी श्रीमंत सकल सौभाग्य संपन्न कांक्षीणी वज्रचुडेमंडित राजमाता वीरांगणा महाराणी लक्ष्मीबाई साहेब महाराज नेवाळकर.
हे चित्र लंडनच्या संग्रहालयात असलेल्या राणी लक्ष्मीबाईंच्या वधूवेश रूपातील चित्राचे फोटो काढून राणीचे भाचे गोविंदराव चिंतामणी तांबे यांनी भारतीय चित्रकाराकडून हुबेहूब तसेच चित्र रेखाटले. त्याच चित्राला संगणकाच्या साह्याने रंगीत करण्यात आले.
No comments:
Post a Comment