आज वसंत पंचमी, सरस्वती पूजनाचा दिवस..
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता
या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता
सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा॥
वसंत पंचमी या तिथीला सरस्वतीदेवी उत्पन्न झाली असे मानतात, म्हणून या दिवशी तिची पूजा करतात. तसेच, या दिवशी नवीन पिकांच्या लोंब्या आणून त्या घरातील देवतेला अर्पण करून नवान्न ग्रहण करतात.
प्रस्तुत मुर्ती त्र्यंबकेश्वर येथील तीर्थराज कुशावर्त च्या वस्त्रांतरगृहाच्या देवकोष्टकात प्रतिष्ठापित केलेली आहे. याठिकाणी विविध देवदेवतांच्या मूर्ती स्थापित केलेल्या आहेत. त्यापैकीच ही एक मूर्ती.
इथे देवी सरस्वती चतुर्भुज असून भव्य अशा हंसावर विराजमान झालेली आहे. दोन हातांमधे वीणा घेतली आहे व वरच्या दोन्ही हातात वेद धारण केले आहेत. दोन्ही बाजूंनी दोन सेवक चवरी ढाळत आहेत. हे देवकोष्टक आकाराने लहान असूनही त्यावरील नक्षीकाम वाखाणण्याजोगे आहे.
(PC : @amolbendkule)
No comments:
Post a Comment