#आईची #ममता आपल्या लेकरांच्या सौख्यासाठी किती पणाला जाऊ शकते हे दर्शविणारा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे.
एका हरिणीनं आपल्या पाडसाचं जीव वाचवण्यासाठी काय केलं ते पाहाल तर तुमच्या डोळ्यातही अश्रू येतील. आपल्या पाडसाला वाचवण्यासाठी ती स्वतः मगरीच्या जबड्यात गेली.
हरणाचं पाडस नदीत उड्या मारत दुडूदुडू पळत सुटतं. नदीत आपल्यासमोर मोठं संकट आहे, याची कल्पनाही त्याला नाही. त्याची आई त्याच्या मागे आहे. तिला आपल्या पिल्लावर येणाऱ्या संकटाची जाणीव होते आणि मग क्षणाचाही विलंब न करता ती धावत सुटते.
पाडस ज्या नदीत धावत गेलं, त्या नदीतील मगर त्या पाडसाला पाहताच त्याच्या दिशेनं वेगानं येत असते. हरिणीला हे दिसतं आणि ती पाण्यात धावत येते. तुम्ही पाहाल तर ती पिल्लाला अडवण्यासाठी किंवा त्याला बाजूला करण्यासाठी त्याच्याजवळ जात नाही किंवा त्याच्या मागेही धावत नाही. तर त्याच्यापासून दूर राहून त्याच्या बाजूनं धावण्याचा प्रयत्न करते.
आपली आई आणि आपला शिकार करायला आलेली मगर आपल्या जवळ आहे, याची कल्पना त्या पाडसाला नाही. ते आपलं मस्त आपल्याच नादात खेळत जात असतं. आई पाडस आणि मगरीमध्ये एक भिंत बनून शांतपणे उभी राहते. पाडसाकडे एकटक पाहत राहते. पाडसापासून आता आपण दुरावणार याची कल्पना तिला असते. त्यामुळे त्याला ती शेवटचं पाहून घेते. त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर असलेला भाव स्पष्टपणे दिसतो. काही क्षणातच मगर त्या हरिणीला आपल्या जबड्यात घेते. हरिण आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत नाही कारण तिनं मुद्दामहून आपला जीव धोक्यात टाकलेला आहे. जेणेकरून आपल्या पाडसाचा जीव वाचेल. पाडस सुखरूपपणे पाण्यातून बाहेर पडते.
वन अधिकारी सुसांत नंदा (Susanta Nanda) यांनी आपल्या ट्विटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.
No comments:
Post a Comment