Monday, 25 January 2021

भक्ती-शक्ती चा संगम असलेला चित्ररथ

२६ जानेवारी, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राजपथावर महाराष्ट्राच्या चित्ररथावर दिसणार 'भक्ती-शक्ती परंपरा'

महाराष्ट्राच्या वतीने 'वारकरी संतपरंपरेवर आधारित चित्ररथ यावर्षी ७२व्या प्रजासत्ताकदिनी (२६ जानेवारी २०२१) रोजी होणा-या राजपथावरील पथसंचलनासाठी सज्ज झाला आहे. 

संतपरंपरा दर्शवणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथावर वारकरी संप्रदायाचा पाया रचणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची ८ फूट उंचीची आसनस्थ मूर्ती खास आकर्षण आहे. संत ज्ञानेश्वरांच्या मूर्ती समोर 'श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ दर्शवण्यात आला आहे.

चित्ररथाच्या मध्यभागी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि वारकरी संप्रदायाच्या इमारतीचे कळस असलेले जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या भेटीवर आधारित 'भक्ती आणि शक्ती'चा संदेश देणारे प्रत्येकी ८ फूट उंचीचे फिरते पुतळे आहेत. 

या चित्ररथावरील महाराष्ट्राचे परम दैवत असणाऱ्या श्री विठ्ठलाची कटेवर हात असणारी ८.५ फूट उंचीची राजस, सुकुमार मूर्ती अवतरली आहे. चित्ररथाच्या शेवटच्या भागात ८ फूट उंचीचा 'संतवाणी' हा ग्रंथ उभारण्यात आला आहे. यावर विविध संतांची वचने लिहिण्यात आली आहेत.

No comments:

Post a Comment

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....