प्रभु श्रीराम आपली भार्या सीता व बंधु लक्ष्मण यांच्यासमवेत वनवासात असताना दंडकारण्यात पंचवटीमध्ये वास्तव्य करून होते. यादरम्यान लक्ष्मणाने शूर्पनखेचे नाक कापून तिला अपमानित करून पाठविले. याचा सूड घेण्यासाठी तिने आपला मोठा भाऊ लंकाधिपती दशानन रावण याच्याकडे सीतेचे हरण करण्याचा हट्ट धरला.
सीतेचे हरण करण्याच्या उद्देशाने रावणाने त्याचा मामा मारीच याला कांचनमृगाचे रूप धारणकरून पंचवटीत पाठविले. त्या मायावी कांचनमृगाचे सुवर्णकाय शरीर पाहता सीतेला त्याची कातडी कंचुकीसाठी वापरण्याची इच्छा झाली. सीतेची इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणून प्रभुरामचंंद्र त्या कांचनमृगाची शिकार करण्यासाठी निघाले. कांचनमृग मायावी असल्यामुळे ते रामाला हुलकावणी देत नांदूरमध्यमेश्वर या ठिकाणी आले. तो मायावी मृग टप्प्यात येताच रामाने निर्वाणीचा बाण मारला आणि मृगाच्या पायाची खुरे तुटली गेली, याची आठवण म्हणून या ठिकाणी मृगव्याधेश्वरची स्थापना करण्यात आली.आजही या ठिकाणी खुर तुटलेले मृग समाधिस्त आहे. ज्या ठिकाणाहून रामाने बाण मारला त्या ठिकाणी बाणेश्वर मंदिराची स्थापना करण्यात आली.
No comments:
Post a Comment