पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर बारव, गिरणारे
नाशिकपासुन अवघ्या २५ किलोमीटरवर दिंडोरी तालुक्यात गिरणारे नावाचं एक गाव आहे. या गावात अहिल्याबाई होळकरांनी बांधलेली एक सुंदर तीन मजली बारव आहे. विटांनी केलेल्या सुंदर बांधकामाची. विशेष म्हणजे 250 वर्षांनंतरही ही ब-यापैकी सुस्थितीत आहे. या बारवचे बांधकाम लाल रंगाच्या विटांनी झालेले आहे. अजूनही ही बारव गावाला पाणी देते. या बारवेच्या भिंतींवर बरिचशी चित्रे काढण्यात आलेली होती. त्यांची निगा न राखल्याने व ही बारव गाळाने भरल्याने ही चित्र नष्ट झाली. मात्र बारवेच्या प्रवेशद्वारावर दोन चित्रे अद्यापही ब-यापैकी सुस्थितीत दिसत असून, त्यांच्या संर्वधनासाठी प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. ही चित्र आवर्जून पहायला हवीत अशीच आहेत.
सदर बारव गाळामुळे बुजलेली असताना गिरणारेच्याच शिवकार्य गडकोट मोहीम संस्थेचे राम खुर्दळ व त्यांच्या सहका-यांनी, स्थानिक ग्रामस्थ व मविप्र सिडको कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने व श्रमदानातून या बारवेला नवसंजीवनी दिली आहे.
Step well at Girnare, Taluka Dindori, Dist Nashik built by Ahilyabai Holkar. This magnificient, 250 years old 3 storied stepwell still intact and well preserved.
No comments:
Post a Comment