निलकंठेश्वर मंदिर
नाशिक हे मंदिरांचे शहर ,, गोदेकाठी अनेक प्राचीन मंदिर असून त्यापैकी एक निलकंठेश्वर मंदिर, बालाजी मंदिराकडून राम कुंडाकडे जाताना गोरेराम मंदिराजवळ हे मंदिर स्थित आहे. संपूर्ण दगडात बांधलेले हे पेशवेकालीन मंदिर अगदी गोदावरीच्या किनारी पूर्वाभिमुख आहे , मंदिर स्थापत्यात हेमाडपंथी व वेसरशैलीचा प्रभावी वापर झालेला दिसतो, मंदिरास मुखमंडप, सभामंडप, अंतराळ, गर्भगृह असून मंदिर मुखमंडपात नंदी आहे. या मंदिराचे बांधकाम ई. स. १७४७ साली सरदार नारोशंकर राजेबहाद्दर यांचे बंधू लक्ष्मणशंकर यांनी त्याकाळातील १ लक्ष रुपये खर्च करून बांधले आहे, पेशवेकाळात नाशिक मध्ये अनेक मंदिरे बांधली गेली त्यातील हे एक महत्वपूर्ण मंदिर असून त्या काळात या देवालयास अनेक दान दिले गेले होते.
Nilkantheshwar temple
Nashik is 'Temple City', so many historical temples in Nashik. Nilkantheshwar Shiva's temple is faces east across the Godavari river & behind of Goreram temple.This temple was built by Laxmanshankar , brother of Naroshankar raje Bahaddur at a cost of 1 lakh Rs. In 1747 AD, Nilkantheshwar temple is Hemadpanthi & vesara architecture with mukhamandapa, Sabhamandapa, antarala, Garbhagruha with artistically designed .
No comments:
Post a Comment