Tuesday, 24 November 2020

सप्तश्रृंगगडावर भाविकांसाठी दर्शनपास सुविधा

सप्तशृंगगड : राज्यातील सर्व धार्मिक स्थळे व त्या संबंधीत सेवा-सुविधा कार्यान्वित करण्यात आल्या असून, त्यानुसार  भाविकांची दर्शन व्यवस्था सुरळीत व गर्दी विरहीत होणेकामी २० नोव्हेंबर २०२० रोजी सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी व तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी, कळवण यांच्या प्राप्त आदेशानुसार विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष व विश्वस्त मंडळ यांनी देवू केलेल्या मार्गदर्शनानुसार विश्वस्त संस्थे मार्फत सोमवार, ( दि.२३) रोजी पहाटे ५ वाजे पासून नांदुरी – घाट रस्त्या दरम्यान असलेल्या कमानी जवळील बंद पडलेल्या टोल प्लाझा येथे प्रत्येक दर्शनार्थी भाविकांना (सर्व वाहन प्रकारानुसार प्रत्येकी वाहनानुसार निर्धारीत संख्येने) श्री भगवती दर्शनपास सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे.

सदर  ऑफलाईन दर्शन पास प्रक्रियेत भाविकांचे नाव, संपर्क क्रमांक, भाविक संख्या, नोंदणी वेळ व संभाव्य दर्शनाची संधी (वेळ) तसेच थर्मलगनचा वापर करून भाविकांच्या शरीराचे तापमान तपासून त्यांना श्री भगवती मंदिर दर्शन पास देणे बाबतची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून, सदर दर्शन पास हा पायी मार्गे व रोपवे माध्यमातून मंदिरात जाणाऱ्या भाविकांना प्राप्त करून घेणे बंधनकारक आहे. फक्त महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या माध्यमातून गडावर येणारया भाविकांसाठी विश्वस्त संस्थेचे रोपवे कार्यालय व पहिली पायरी येथिल देणगी कार्यालयात सदर दर्शन पास उपलब्ध करून दिला जाणार आहे. मात्र त्यासाठी भाविकाला प्रवास मार्गाचे तिकीट संबंधित कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....