ळ' अक्षराचा घडलेला किस्सा...
सुधीर फडके उर्फ बाबूजी यांनी ग दि माडगूळकर यांना, प्रत्येक ओळींच्या शेवटी 'ळ' हे अक्षर येईल असे वेगळे भावगीत लिहून द्या असे सांगितलं....
अण्णांनी ते चॅलेंज स्वीकारलं, आणि केवळ 15 मिनिटांत गाणं लिहिलेला कागद बाबूजींना आणून दिला...
आणि म्हणाले,बाबूजी, तुला 'ळ' हे अक्षर हवे होते ना? घे...
एवढे बोलून गदिमा निघाले, तसे बाबूजी म्हणाले, आण्णा, कुठे निघालात? गाण्याची चाल ऐकूनच जा....
आणि बाबूजींनी हार्मोनियम घेतली, चाल कंपोझ केली....
आणि "यमन" रागात एक अप्रतिम भावगीत जन्माला आले...
गदिमा यांनी लिहिलेल्या त्या भावगीताच्या ओळी अशा होत्या....
सुटली वेणी केस मोकळे
धूळ उडाली भरले डोळे
काजळ गाली सहज ओघळे
या साऱ्याचा उद्या गोकुळी
होईल अर्थ निराळा
घन निळा लडिवाळा
झुलवू नको हिंदोळा
हे भावगीत बाबूजींनी माणिक दादरकर (माणिक वर्मा) यांच्याकडून गाऊन घेतले, ते आजही उत्तम आहे, लोकप्रिय आहे, अजरामर आहे....
ग्रेट गदिमा....ग्रेट बाबूजी...
खरे प्रतिभासंपन्न..
हे गाणं शुभा खोटेंवर चित्रित केले...आणि तबल्यावर साथ करत आहेत उस्ताद अहमद जान थिरकवा आणि हार्मोनियम वर तुळशीदास बोरकर...
No comments:
Post a Comment