संकष्टी चतुर्थी निमित्त नाशिक मधील श्री साक्षी विनायक गणेश या पुरातन गणेश स्थानाची माहिती घेऊयात.
नाशिकच्या सोमवार पेठेतील शौचे वाड्यात श्री साक्षी विनायक गणेश स्थित आहे. हा भग्न अवस्थेतील वाङा जुन्या नाशिकच्या सुप्रसिद्ध गुलाल वाडी व्यायाम शाळे जवळ आहे. याच वाडयात ३ ते ४ फुट उंचीची गणपतीची संगमरवरी मूर्ती आहे. हा गणपती श्री साक्षी विनायक गणेश या नावाने ओळखला जातो. हातात जपमाळ असलेली ही अनोखी गणेशमूर्ती दुर्मिळ आहे. श्री गणेशाच्या चारी हातात अंकुश, परशु, मोदकपात्र व जपमाळ आहे. सोबत मूषकराजही लाडू खात आहे.
अश्या या ऐतिहासिक वाड्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनीही वास्तव्य केल्याचे जुने लोक सांगत असत. या वाड्यात असलेल्या परंतु आता मातीने बुजलेल्या आडात अनेक शस्त्रे सापडत असे. सुप्रसिद्ध रवीन्द्रनाथ विद्यालयाची स्थापना ह्याच वाड्यात झाली. अनेक वर्ष शाळेचे वर्ग इथेच भरत असे. रवीन्द्रनाथ विद्यालयाचे संस्थापक कै.पुरुषोत्तम शिवशंकर शौचे ह्यांना आदर्श शिक्षक राष्ट्रपति पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment