Monday, 6 June 2022

किल्ल्यांप्रमाणेच शत्रूंपासून बचाव करण्यासाठी फसवे दरवाजे असलेली घरटी बनवणारा पक्षी

 किल्ल्यांप्रमाणेच शत्रूंपासून बचाव करण्यासाठी फसवे दरवाजे असलेली घरटी बनवणारा पक्षी 








फिरंगी चिमणी प्रजातीचे हे  स्थलांतर करणारे पक्षी सुंदर घरटी बनवतात. या घरट्याचे वैशिष्ट्य म्हणजे या घरट्यांना दोन प्रवेशद्वारे असतात. एक दरवाजा असतो शत्रूला फसवण्यासाठी व दुसरा खरा दरवाजा अंडी व पिल्लांना राहण्यासाठी. खरा दरवाजा इतका छोटा असतो कि त्यातून साप किंवा इतर मोठे पक्षी घरट्यात प्रवेश करू शकणार नाहीत, मात्र लवचिकपणामुळे हे पक्षी त्याच दरवाजातून आत जातात. हा दरवाजा फसव्या दरवाज्यावरच्या झाकणासारखा दिसतो व शत्रू फसून दुसऱ्या दरवाज्याकडे वळतो. 


दुसरा आकाराने मोठा दरवाजा खास शत्रूंसाठी तयार केलेला असतो व त्यातुन शत्रू आत घुसतो मात्र ती घरट्याची अतिशय अरुंद असलेली खोली असते व त्यात शत्रूला आपले भक्ष्य मिळून येत नाही त्यामुळे तो परत फिरतो. व अशाप्रकारे हा अक्षी किंवा त्याची अंडी व पिल्ले सुरक्षित राहतात. 


ही घरटी गवताने बनवलेली व अतिशय लवचिक असतात. त्यांच्यावर पावसाचा, पाण्याचा अथवा वादळाचा काहीही परिणाम होत नाही.  या पक्षांचे इंग्रजी भाषेतील नाव European Penduline Tit असे आहे.







No comments:

Post a Comment

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....