Monday, 23 May 2022

विस्मृतीत चाललेला अशोक स्तंभ, नाशिक

 *विस्मृतीत चाललेला अशोक स्तंभ, नाशिक*




नाशिकचा अशोक स्तंभ अजुनही आहे पण नाशिककरांनाच त्याचा विसर पडायला लागला आहे! तसा पत्ता सांगण्यासाठी, रिक्षा वाल्यांना सांगणे साठी त्याचा उपयोग होतो आहे.  


अशोक स्तंभ नेमका कधी बांधला होता, व त्यावरील पुर्वीच्या शिलालेखात काय लिहीले होते ते शोध करुनही सापडले नाही. वरील फोटोत असलेले शिलालेख हे स्तंभाचे स्थानांतरण करतांनाचे आहेत तेव्हा त्यात श्रेय नामावली वगैरेची रेलचेल! पुर्वी म.गांधीजींचे रेखा चित्र, त्यांचे सुविचाराचे खाली होते असे म्हणतात!   


आमच्या लहानपणी अशोक स्तंभ आग्रारोड च्या मध्यवर्ती ठिकाणी होता. दक्षिणेकडुन येणाऱ्या गाड्या त्यास वळसा घालुन नवीन तांबट गल्ली ओलांडून रविवार कांरज्या कडे जात असत. स्तंभा  भोवती असलेल्या पायऱ्यांवर बसुन गाड्यांकडे बघणे हा लहानपणीचा उद्योग तेथील पोलीसाचे सौजन्याने करीत असु. शिवाय गंगापुर रोड वरुन वकील वाडीत जातांना रोड क्राँस करणेसाठी स्तंभाचा मिळणारा आधार हा सुखद होता.


खरा नाशिककर "अशोकस्तंभ" न म्हणता केवळ "स्तंभ" असा उल्लेख करतो. १९९० च्या दरम्यान  रविवारी संध्याकाळी स्तंभावर लंडनच्या धर्तीवर उस्फूर्तपणे भाषण करणाऱ्यां साठी "हाईड पार्क" नांवाचे व्यासपीठ चालविले जाई असे अंधुकसे आठवते. अशोकस्तंभ मित्र मंडळाचा दर वर्षीचा गणपती नावीन्यपूर्ण असे व तो पाहण्यासाठी भरपूर गर्दी लोटत असे. फार पूर्वी स्तंभावर टांगा स्टॅन्ड व गुरांना पाणी पिण्यासाठी पाण्याचा हौद असल्याचेही आठवते. स्तंभाला लागूनच असलेल्या "सर्कल" चित्रपट गृहात सकाळी १०.०० वाजता जुने इंग्लिश पिक्चर दाखवले जात. कॉलेजला दांडी मारून विद्यार्थ्यांची या मॅटिनी शो ला उपस्थिती असे. सर्कल थिएटर बाहेरील वडापाव त्याकाळी फेमस होता,, त्या नंतर दोन वडे वाले अजून झाले,पण काळाच्या ओघात वडे त्याचे छोटे होत गेले,,,आपण पैसे वड्याचे देत आहोत आणि भजी इतका वडा खातो,,हे लोकांना कळेनासे झाले,,मग या गोष्टीचा अभ्यास करून मोरे बंधू यांनी जम्बो वडा पाव व त्याच बरोबर तीन चटण्या सुरू केल्या,,,व अल्पावधीत मोरे बंधू चा नाशिक वडा पाव हा नाशिककरांचा आवडता ब्रँड बनला.        


नाशकातील विविध मिरवणूका या अशोक स्तंभाला वळसा घालुनच जात असत! वळणावर नासिक ढोल, मिरवणूकीत असलेले विविध कलाकार स्तंभावर आपले कलाप्रदर्शन अति कौशल्याने व भरपुर वेळ करायचे! गणपतीच्या मिरवणुकीतले देखावे, यशवंत व्यायाम शाळा व गुलालवाडीची लेझीम पथके येथे विशिष्ट कलाकृती सादर करीत! राजकीय मिरवणूक हा वेगळा अनुभव आणि मुख्य नेता येथे आपली उपस्थिती दाखवून द्यायचे!   


हा मध्यवर्ती असलेला अशोक स्तंभ राष्ट्रीय भावना जागृत करत होता यात शंका नाही. स्तंभा जवळ अनेकवेळा ध्वज वंदना होत असे. आजुबाजुचे लोक, खाणीजवळच्या झोपड पट्टीतील व घनकर गल्ली वगैरे ठिकाणचे अनेक तेथे ध्वजवंदना द्यायचे! जवळच असलेले ढोल्या गणपती मंदिरात जाणे हा पण अनेकांचा नित्य क्रम!  अशोक स्तंभा विषयक जुने फोटो, माहीती असल्यास कळवणे.


शक्य झाले तर अजुनही अशोक स्तंभ बघा! नाहीतर कुणीच येत नाही हे बघुन अदृश्य व्हायचा!!


जाणून घ्या आदिशक्ती आदिमाया भगवती सप्तश्रृंगी देवीचा महिमा

https://nashikpratibimb2.blogspot.com/2020/10/blog-post_24.html


(फॉरवर्ड)

No comments:

Post a Comment

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....