कोल्हापुर महालक्ष्मी मंदिरातील मातृलिंग
कोल्हापुर येथील अंबाबाई मंदिरात एक शिवलिंग आहे यास मातृलिंग असे म्हणतात. हे अचूक खालील अंबाबाईच्या मंदिरातील मुर्तीच्या गर्भगृहाच्या वरती आहे. त्याकडे जाण्यासाठी गुप्त मार्ग असून अत्यंत चिंचोळ्या जागेतून जाण्यासाठी दहा बारा पायऱ्या आहेत. वर गेल्यावर एक प्रशस्त मंदिर दिसते. पहिल्या भागात नंदी विराजमानअसून गर्भगृहात शिवलिंग व वर श्रीगणेशाची स्थापना केलेली आढळते.
हे लिंग म्हणजे साक्षात महालक्ष्मीचे लिंगरूप म्हणतात. ज्या ज्या ठिकाणी महादेवाची मंदिरे आहेत त्या ठिकाणी पूर्ण प्रदक्षिणेला परवानगी दिली जात नाही ; पण विशेष म्हणजे मातृ लिंगाला पूर्ण प्रदक्षिणा करतात.
No comments:
Post a Comment