https://www.youtube.com/watch?v=gx8BCsuR-sk
सहयाद्री पर्वताच्या कुशीतील गोदावरी नदीच्या तीरावर नाशिक हे शहर वसलेले आहे. नाशिक हे शहर पुराणकाळापासून प्रसिध्द व पवित्र क्षेत्र म्हणून ओळखले जाते. नाशिक या नावाचा उगम रामायण या महाकाव्याशी जोडला जातो. पौराणिक काळातील चौदा वर्षाच्या वनवास काळात राम, लक्ष्मण व सीता यांचे नाशिक जवळील पंचवटीमध्ये वास्तव्य होते. या महाकाव्यानुसार लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक कापले. त्यामुळे या जागेचे नाव ‘नासिक’ असे पडले. महाराष्ट्र सरकारने ते बदलून नाशिक केले. या शहराला “नाशिक” हे नाव कसे पडले या बाबत दोन मान्यता आहेत. नाशिक आणि पंचवटी या दोन भागांतून जी गोदावरी नदी वाहते ती नऊ टेकड्यांच्या मधून वाहते म्हणजे ‘नव शिखां’ मधून वाहते . शिखा या संस्कृत शब्दाचा अर्थ टेकडी असा होतो.त्यावरून ‘नव शिखा’ नगरी वरून नाशिक झाले. “नऊ शिखरांचे शहर” म्हणून “नवशिख” आणि नंतर अपभ्रंश होऊन नाशिक असा एक मतप्रवाह आहे. तसेच दुसरा संदर्भ रामायणाशी निगडीत आहे. राम, त्यांची पत्नी सीता आणि बंधु लक्ष्मण नाशिक मधील पंचवटी परिसरात वास्तव्यास असताना शूर्पणखा या रावणाच्या बहिणीचे नाक (संस्कृत भाषेमध्ये ‘नासिका’) लक्ष्मणाने या ठिकाणी कापले. त्यावरून नासिक अथवा नाशिक, हे नाव पडले असेही म्हणतात. हा मतप्रवाह अधिक प्रचलित आहे. नासिकचा डोंगर ही सह्याद्रीच्या नासिकासदृश आहे म्हणूनही नासिक हे नाव पडले असावे, अशी दाट शक्यता आहे.
पुरातन काळापासून नाशिक शहर व त्या आसपासचा परिसर विविध नावांनी ओळखला जात असे. जनस्थान, त्रिकंटक, गुलशनाबाद, नासिक, आणि विद्यमान नाशिक अशी अनेक नावे या परिसरास होती असे उल्लेख आढळतात. प्राचीन व ऐतिहासिक काळापासून नाशिक धार्मिक स्थळ मानले गेले आहे. रामायणात नाशिक परिसरातील ‘पंचवटी’ येथे श्रीराम वास्तव्यास होते, असा उल्लेख आहे. महाकवी कालिदास व भवभूती यांनी त्यांच्या लेखनात नाशिकबद्दल आदराचे उद्गार काढले आहेत. मोगल साम्राज्याच्या काळात नाशिक ‘गुलाबांचे शहर’ म्हणून ‘गुलशनाबाद’ या नावाने ज्ञात होते.
भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी सिंहस्थ कुंभमेळ्याचे क्षेत्र नाशिक आहे. दर १२ वर्षांनी येथे कुंभमेळा भरतो. येथील मंदिरे व गोदावरी नदीवरील घाट प्रसिद्ध आहेत. इ.स. १२०० सालाच्या सुमारास खोदलेली पांडवलेणी आहेत. गोदावरी नदीला नाशकात दक्षिण गंगा म्हणतात.
नाशिक जिल्हा 18.33 आणि 20.53 डिग्री उत्तर अक्षांश आणि 73.16 डिग्री आणि 75.16 डिग्री पूर्व रेषेच्या दरम्यान समुद्रसपाटीपासून 565 मीटर उंचीवरील महाराष्ट्राच्या उत्तरपश्चिम भागांमध्ये स्थित आहे. जिल्ह्याला महान पौराणिक पार्श्वभूमी आहे. भगवान राम आपल्या वनवासा दरम्यान पंचवटी येथे वास्तव्य करीत होते. अगस्ती ऋषी तपस्यासाठी नाशिकमध्ये राहिले. गोदावरी नदी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथुन उगम पावते. त्र्यंबकेश्वर शिव मंदिर त्र्यंबक येथे स्थित आहे, ते बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे, त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र येथे हिंदू वंशावलीची नोंदणी केली जाते. पवित्र गोदावरी नदीचे उगम त्रिंबकेश्वर येथे आहे.
नाशिकला मिनी महाराष्ट्र असेही म्हणतात, कारण सुरगाणा, पेठ, इगतपुरीचे हवामान कोकण सारखे आहेत. निफाड, सिन्नर, दिंडोरी, बागलाण हे पश्चिम महाराष्ट्र सारखे आणि येवला, नांदगाव, चांदवड ब्लॉक विदर्भ विभागा सारखे आहेत.
लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा तिस-या क्रमांकाचा जिल्हा आहे. येथे लोकसंख्या 61,09,522 लोक आणि 15,582 चौ.कि.मी. क्षेत्रफळ आहे. उत्तरेला धुळे जिल्हा, पूर्वेस जळगांव जिल्हा, दक्षिणपूर्व ओरंगाबाद जिल्हा, दक्षिणेकडील अहमदनगर जिल्हा, नैऋत्येला ठाणे जिल्हा, पश्चिमेला गुजरातचे वलसाड व नवसारी जिल्हे, आणि उत्तर पश्चिमेला डांग जिल्हा आहे. नाशिक किंवा नासिक (प्रत्ययापूर्वीचे सामान्यरूप नाशक) हे महाराष्ट्राच्या उत्तर भागातील शहर आहे. सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या शहरातील लोकसंख्या अंदाजे १४,००,००० आहे. या शहरात उत्तर महाराष्ट्राचे, नाशिक जिल्ह्याचे व नाशिक तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. गोदावरी नदीच्या काठावरील हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. नाशिक शहराच्या दक्षिणेला त्रिरश्मी लेणी ही प्रसिद्ध अशी प्राचीन बौध्द लेणी आहे. नाशिक जिल्ह्यात मुख्यत्वे द्राक्ष व कांद्याचे उत्पादन होते. त्याप्रमाणेच वाईन-निर्मितीसाठीही नाशिक प्रसिद्ध आहे. त्यामुळे भारताची नापा व्हॅली म्हणून आता नाशिक व नजीकचा परिसर नव्याने प्रसिद्ध होत आहे.
नाशिक जिल्हा महाराष्ट्रच्या उत्तरभागी १९.३३ आणि २०.५३ या उत्तर अक्षांश व ७३.१६ आणि ७५.१६ या पूर्व रेखांश या भौगोलिक पटृयात वसलेला आहे. जिल्हयातील सर्व नद्या सहयाद्रीपर्वतात उगम पावून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. वरील दोन तालुके वगळतात उर्वरित जिल्हयाच्या मध्यातून पूर्व-पश्चिम अशी रेषा गृहीत धरल्यास जिल्हयाचे दोन भाग होतात.या रेषेच्या उत्तरेकडील भागातील पावसाचे पाणी गिरणा व तिच्या उपनद्यांद्वारे सरते शेवटी तापी नदीत वाहून जाते. तर रेषेच्या दक्षिणेकडील भूभाग गोदावरीचे खो-यात वसलेला आहे. जिल्हयातील नद्यांचे प्रमुख वैशिष्टय म्हणजे जिल्हयातील सर्व नद्या जिल्हयातच उगम पावतात. एकही जल प्रवाह जिल्हा बाहेरून नाशिक जिल्हयात येत नाही. पेठ आणि सुरगाणा या तालुक्यातील जलप्रवाहाव्यतीरीक्त इतर सर्व जलप्रवाह पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. जिल्हयाच्या पश्चिम सिमेवर सहयाद्री पर्वतमाला आहे. तसेच जिल्हयात अनेक डोंगर आहेत. जिल्हयातील बहुतेक सर्व डोंगर पश्चिमेकडील सहयाद्री पर्वताचे पूर्वेकडे पसरलेले फाटे आहेत.
महाराष्ट्रतील सर्व विविधता नाशिक जिल्हयात दिसून येतात. सुरगाणा आणि पेठ या तालुक्यातील पावसाचे प्रमाण, हवामान, पिके हे कोकणातील सर्व बाबींशी समरूप आहेत.या तालुक्यातील वनात उत्कृष्ट प्रतिचा साग व इतर वनउपज मोठया प्रमाणात मिळतात. याच डोंगराळ भागात मोठया प्रमाणात आदीवासी राहतात. जिल्हयाच्या मध्य व पूर्व भागात पश्चिम महाराष्ट्रसारखी भाजीपाला, फळे आणि मोठया प्रमाणात उस पिकतो. या भागात साखर कारखाने आहेत. या भागात ओलीता खालील क्षेत्र मुबलक असल्यामुळे दुधाकरीता आवश्यक असलेल्या हिरव्या चा-याची पिके मोठया प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे दुधाचे उत्पादन भरपूर होते. जिल्हयात उत्पादन होणारा भाजीपाला मोठया प्रमाणात मुंबईला पुरविला जातो म्हणून नाशिक जिल्हयास मुंबईची परसबाग व गवळीवाडा असेही म्हणतात. पुणे, मुंबई प्रमाणेच नाशिक जिल्हयाचे झपाटयाने औद्योगिकरण होत आहे. जिल्हयाच्या पूर्व भागात हवामान उष्ण असल्यामुळे येथे विदर्भ-मराठवाडा प्रमाणे कापूस व ज्वारीचे उत्पादन सुध्दा होते.
नाशिक प्रदेशाच्या अस्तित्वाचा उल्लेख पुरातन काळातील पाषाण युगापर्यंत जातो. तसेच पौराणिक उल्लेखानुसार थेट रामायण काळाशी संबंध येतो. प्रभु रामचंद्रांचे मुख्यत्वे वनवासातील बारा वर्षांचे पुनित वास्तव्य नाशिक परिसरात गोदावरीच्या काठी पंचवटीत होते. जिल्हयाचे मुख्यालय असलेले नाशिक शहर हे प्राचिन काळापासून तिर्थक्षेत्र म्हणून प्रसिध्द आहे. जिल्हयातील श्री क्षेत्र त्रंबकेश्वर आणि सप्तशृंगीगड ही तर भाविकांची श्रध्दा स्थाने आहे.
सध्याचा नाशिक जिल्हयाचा बहुतांश भाग इ.स.१३१३ ते १३४७ या काळात देवगिरीच्या यादवांच्या अधिपत्याखाली व त्यानंतर १४९० पर्यंत बहामणी राज्याचा एक भाग होता. इ.स. १४९० ते १६३६ या काळात तो अहमदनगरच्या निजामशाहीत समाविष्ट झाला होता. छत्रपती श्री.शिवाजी महाराजांनी मुस्लिम सत्तेच्या जोखाडातुन हा भाग मुक्त केला पेशवाईच्या अस्ता नंतर इ.स.१८१८ पासून हा सर्व भूभाग ब्रिटिशांचे अधिपत्याखाली गेला. मध्य युगात प्रशासकीय दृष्टया नाशिक जिल्हयाचा काही भाग अहमदनगर व काही भाग खांदेश जिल्यात होता. १८६९ मध्ये नाशिक हा स्वतंत्र जिल्हा करण्यात आला. तेव्हा पासून १३ तालुके असलेल्या या जिल्ह्यात दि. २६.६.९९ पासून देवळा व त्र्यंबक या नविन तालुक्यांची निर्मिती होऊन एकुण १५ तालुके अस्तित्वात आले आहेत.
पौराणिक व ऐतिहासिक सांस्कृतिक पंपरेची संपन्नता लाभलेला नाशिक जिल्हा आता औद्योगिक क्षेत्रातही विकासाकडे वाटचाल करीत आहे. नाशिक जिल्हा ऐतिहासिक व धार्मिक स्थळांकरिता प्रसिध आहे. नाशिक पासून २८ कि.मी. अंतरावर १२ ज्योतिलिगापैकी एक ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र त्रंबकेश्वर आहे. नाशिक पासून ७२ कि.मी. अंतरावर वणीजवळ सप्तशृंगी देवीचे प्राचीन मंदीर असून तेथे दरवर्षी संपूर्ण देशातून हजारो भाविक यात्रेच्या निमित्ताने भेट देत असतात. जिल्हा परिषदे तर्फे नांदूरी येथे नवरात्र उत्सवाचे दरम्यान वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. नाशिक येथे पंचवटी हे पवित्र धार्मिक स्थान असून जवळच भक्तीधाम व नाशिक रोड येथे मुक्तीधाम ही अत्याधुनिक साधनांनी तयार कलेली मंदीरे आहेत. नाशिक येथे दर १२ वर्षांनी सिंहस्थ पर्वणी काळात कुंभमेळा भरतो त्या करिता भारतातून लाखोंच्या संख्येने भाविक लोक नाशिकला येतात.
नाशिक जिल्हयाला तशी प्रारंभीपासूनच धार्मिक तिर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. प्रभु रामचंद्राच्या पदपर्शाने पावित झालेला, पवित्र गोदावरीचे उगमस्थान असलेला, संप्तशृंगीगड, त्र्यंबकेश्वर सारख्या धार्मिक स्थळांनी प्रसिध्द असलेला आणि कुंभमेळयामुळे जगात ओळख असलेल्या नाशिक जिल्हयाला ऐतिहासिक, धार्मिक पाश्र्वभूमी लाभलेली आहे. धार्मिक स्थळांमुळे प्रसिधद असलेल्या या जिल्हयाने औद्योगिकीकरणातही गरुडभरारी घेवून मंत्रभूमी ते यंत्रभूमी अशी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नाशिक जिल्हयात १५ तालुके असून त्यातील ८ आदिवासी तालुके आहेत. अन्य तालुक्यातही आदिवासी समाजाची संख्या ब-यापैकी आहे. पेठ, सुरगाणा, त्र्यंबक सारख्या आदिवासी तालुक्यांमध्ये डोंगर आणि दर्यां चाच मोठा भाग असल्याने या तालुक्यात अद्यापही दळणवळण यंत्रणा सर्वदूर पोहचलेली नाही. मालेगाव हा तालुका मालेगाव तालुक्यातील माळमाथा परिसर, येवला, नांदगाव, चांदवड तालुक्याचा काही भाग हे कमी पावसाचे तर त्र्यंबक, इगतपुरी, पेठ, सुरगाणा, कळवण, बागलाण जास्त पर्जन्याचे क्षेत्र आहे. जिल्ह्यात २२ धरणे असून नाशिक तालुक्यातील गंगापूर हे मातीचे धरण म्हणून प्रसिध्द आहे.
नाशिक जिल्हयास समृद्ध असा सांस्कृतिक चेहराही लाभला आहे. प्रत्येक तालुक्याला वेगळी अशी सांस्कृतिक ओळख आहे. आदिवासी समाजाचे कोकणी नृत्य, लोकगीत, डोंग-यादेव उत्सव प्रसिध्द आहेत. विविध गावातील, समाजातील उत्सव, यात्रा, सण-समारंभ भिन्न असल्याने प्रत्येकाला एक वेगळा सांस्कृतिक व सामाजिक चेहरा प्राप्त झाला आहे. आदिवासी समाजाचा पेहरावदेखील त्यांच्या परंपरागत रुढी व्यवस्थेचे ओळखपण सांगणारा आहे.
जिल्हयातील प्रमुख व्यवसाय शेती असून द्राक्ष, कांदा, डाळिब व उसाचे उत्पादन मोठया प्रमाणात घेतले जाते. जिल्हयात वायनरी उद्योगही मोठया प्रमाणात वाढला असून नाशिकला आता वाईन कॅपिटल ही नवीन ओळख मिळाली आहे. निफाड तालुक्यातील लासलगाव येथील कांदयाची बाजारपेठ तर आशिया खंडात प्रसिध्द आहे. जिल्हयात पाच सहकारी साखर कारखाने तर दोन खाजगी साखर कारखाने आहेत. त्याचबरोबर भारत प्रतिभूती मुद्रणालय (इंडिया सिक्युरिटी प्रेस), करन्सी नोट प्रेस, ओझरे येथील विमान निर्मिती कारखान, एकलहरे येथील औष्णिक विज निर्मिती केंद्र, आरोग्य विज्ञान विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यामुळेही नाशिक जिल्हयाला विशेष महत्व आहे.
No comments:
Post a Comment