सोल्युशन मोड (Keep Solution Mode On)
एकदा एका इंजिनिअर ची भर दुपारी कार निर्जन रस्त्याच्या पुलावरच पंक्चर झाली. तो वैतागला, शेवटी पर्याय नाही म्हणून उतरला खाली अन लागला चाक बदलायला. चारही बोल्ट काढले अन डोक्यावरचा घाम पुसायला उठला, उठतांना पायाचा धक्का लागला अन चारही बोल्ट पुलावरून पाण्यात पडले. आता तर जाम वैतागला.
त्याला काही सुचेना, स्वतःच्या नशिबाला, घरच्यांना दोष देत सुटला. प्रॉब्लेमवर विचार करित बसला कसा काय आला प्रॉब्लेम, कोणामुळे आला प्रॉब्लेम.
तेवढ्यात तिकडून एक माणूस सायकलवर पुलावरून चालला होता. तो त्या इंजिनिअरला म्हणाला, "काहो, काय झालं? काही मदत करू का"?
इंजिनिअर : "तु काय मदत करणार, माझीच बोंब पडत नाही. या उन्हानं वैतागलोय आधीच, चाकही पंक्चर झालं. चारही बोल्ट पडले पाण्यात, अन तु काय दिवे लावणार"?
सायकलवाला हसून म्हणाला, "अरेच्या एवढच ना! सोप्पा मार्ग आहे".
इंजिनिअर ः "इथं मी वैतागलोय, आता काही मार्ग नाही अन तुला गंमत सुचतीय, वर हसतोय माझ्या फजितीवर..."
सायकलवालाः "अहो साहेब, खरच सोप्प आहे हो. उरलेल्या तीन चाकांचे एक एक नट काढा अन प्रत्येक चाकाला तिन नट लावून हळुहळू पुढे जा गॅरेजपर्यंत, तिथं गेल्यावर त्याच्याकडून चार बोल्ट घ्या अन प्रत्येक चाकाला एक एक लावा."
इंजिनिअर : "खरच की भन्नाट आयडीया.. पण मला का नाही सुचली"?
No comments:
Post a Comment