तेरा वर्षे वयाच्या नाशिकच्या आदित्य दारके या छोट्या मुलाने त्र्यंबकेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्ट, त्र्यंबकेश्वर साठी Trimbakeshwar devsthan हे ऍंड्रॉईड मोबाईल ॲप बनवले आहे. आदित्य हा न्यु इरा इंग्लिश स्कूल, नाशिक चा विद्यार्थी असून इ. ८ वीत शिकत आहे.
नुकतेच या ॲपचे नाशिकचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. अभय वाघवसे यांच्या हस्ते व त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष मा. एम. एस. बोधनकर,जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली आणी सर्व विश्वस्तांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.
या ॲपद्वारे भाविकांना घरबसल्या श्री त्र्यंबकेश्वर ज्योतीर्लिंग चे लाईव्ह दर्शन घेता येईल तसेच ऑनलाईन देणगी ही देता येऊ शकते. सदर ॲप गूगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करता येईल. तरी या सुविधेचा सर्व भक्तांनी सदर ॲप डाऊनलोड करून अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे करण्यात आले आहे.
सदर ॲप खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करूनही डाऊनलोड करता येईल.
https://play.google.com/store/apps/details?id=com.shritrimbakeshwardevsthan.app
No comments:
Post a Comment