हे फोटो आहेत स्पेन चा इवान फर्नांडीज केनिया च्या हाबेल मुताई ला स्पर्धा जिंकण्यासाठीची रेष ओलांडण्यास मदत करतानाचा.
झाले असे की,२०१२ साली स्पेनच्या नावरा येथे क्रॉस कंट्री रेस मॅरेथॉन आयोजित केली गेली होती. त्यात अनेक देशांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी स्पर्धक आले होते. इवान फर्नांडिज अनाया हा स्पेनचा धावपटू यात सहभागी झाला होता. शर्यत अखेरच्या टप्प्यात असताना केनियाचा हाबेल मुताई शर्यत जिंकण्यापासून शेवटच्या ओळीपासून काही फूट अंतरावर होता, परंतु तो चिन्हात गोंधळून गेला आणि त्याला वाटले त्याने शर्यत पूर्ण केली. स्पॅनिश स्पर्धक इवान फर्नांडिज त्याच्या मागे होता.
इवान च्या हे लक्षात येताच त्याने केनियन हाबेल ला सांगायचा प्रयत्न केला. परंतु हाबेल ला स्पॅनिश भाषा समजत नसल्यामुळे त्याला काही समजत नव्हते तेव्हा इवान फर्नांडिज ने त्याला आपल्या हातांनी ढकलत विजयी रेष ओलांडण्यास मदत केली. शर्यत जिंकण्याऐवजी इवानने हाबेलला शेवटच्या ओळीपर्यंत पुढे नेले आणि स्वतः दुसर्या क्रमांकावर आला. इवानने आपल्या कृतीतून उत्कृष्ट क्रीडापटू आणि सभ्यतेचे उदाहरण जगासमोर ठेवले.
पत्रकाराने याबद्दल विचारल्यावर " आपण केनियन स्पर्धकाला का जिंकू दिले?"
इवान: "मी त्याला जिंकू दिले नाही, तो जिंकणार होता".
पत्रकार: पण तुम्ही जिंकू शकले असता!
इवान: पण माझ्या विजयाची योग्यता काय असेल? त्या पदकाचा सन्मान काय असेल?
माझ्या आईला त्याबद्दल काय वाटेल?
आपण आपल्या वागण्यातून पुढच्या पिढीला काय शिकवतो हे खूप महत्त्वाचे असते.
आपल्याला मुलांना सुद्धा जिंकणे हा एकमेव पर्याय असतो हे न शिकवता तत्वनिष्ठ राहून मानवी मुल्ये शिकवा.
No comments:
Post a Comment