Monday, 30 November 2020

अमेरिका का महान आहे?

अमेरिका का महान आहे? 

मे महिन्यात अमेरिकेत एका गो-या पोलिसाने फ्लॉयड नावाच्या कृष्णवंशीय नागरिकाला भर रस्त्यावर ठार मारले. याचा निषेध संपूर्ण अमेरिकेत झाला.

जो बायडेन, अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती यांनी नुकतीच मृत फ्लॉयडच्या मुलीची गुडघे टेकून जाहीर माफी मागितली. या घटनेतील आरोपी पोलिसाच्या पत्नीनेही त्याला घटस्फोट दिलाय!


नेते घडतात नागरिकांच्या वर्तणूकीने व संस्कारांनी; त्यामुळेच देश घडतो. 




चांदीचा गणपती मंदिरात दीपोत्सव

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त नाशिककरांचे श्रद्धास्थान असलेल्या चांदीचा गणपती मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला.

चांदीचा गणपती रविवार कारंजा नाशिक

@Chandichaganapti



Sunday, 29 November 2020

श्री गुप्तसर साहेब गुरूद्वारा, मनमाड, नाशिक

 श्री गुप्तसर साहेब  गुरूद्वारा, मनमाड, नाशिक

आज गुरु परब म्हणजेच श्री गुरु नानक जयंती देशभर हर्षोल्हासात साजरी केली जात आहे. त्यानिमित्तने आज देशभरात प्रसिद्ध असलेल्या मनमाड येथील श्री गुप्तसर साहेब गुरुद्वाराबद्दल जाणून घेऊयात.

या गुरुद्वाराशी संबंधित ऐतिहासिक आख्यायिका थेट शिखांचे १०वे गुरु श्री गोविंदसिंहजी यांच्याशी संबंधित आहे. गुरु श्री गोविंदसिंहजी नांदेडला असताना त्यांनी दोन मराठा सरदार बाळाराव व रुस्तुमराव यांची साता-याच्या अजिंक्यतारा किल्ल्याला शत्रुचा वेढ्यातून सुखरूप सुटका केली व त्यांना मनमाडला आणले व याठिकाणी ठेवले. 

त्यानंतर, बाबा निधानसिंग यांनी सन १९३१ मध्ये कारसेवेद्वारा याठिकाणी  गुरुद्वाराचे बांधकाम सुरु केले. बांधकाम सुरु असताना अत्यंत गोड व मधुर स्वादाचे पाणी असलेली एक गुप्त विहीर सापडली. हा शुभशकून समजून या गुरुद्वाराचे नाव श्री गुप्तसार साहेब गुरुद्वारा असे ठेवण्यात आले. अतिशय भव्य व सुंदर अशा या गुरुद्वाराला भेट देण्यासाठी सर्व जगभरातून शीख भाविक दर्शन घेण्यासाठी येत असतात. लॉकडाऊनच्या काळात या गुरुद्वाराच्या लंगरच्या माध्यमातून दररोज १५००० जणांना अन्नदान करण्यात आले.

The historical connection of Manmad is to the tenth Guru, Shri Guru Gobind Singh Ji who during his stay at Nanded, secured the release of two Maratha chiefs- Bala Rao and Rustom Rao from the Satara Fort and brought them to Manmad.

Baba Nidhan Singh started karseva for construction of this Gurudwara in 1931. A hidden well was found with sweet water, because of which the Gurudwara was named Gurudwara Guptsar Sahib

A large two-storeyed entrance gated leads to the courtyard. To the left is the large diwan hall with walls decorated with multicoloured glass pieces and reflective mirrors arranged in geometrical patterns.









हरिहर भेट सोहळा, श्री कपालेश्वर महादेव, नाशिक

 वैकुंठ चतुर्दशी च्या दिवशी मध्यरात्री होणारा हरिहर भेट सोहळा...

श्री कपालेश्वर महादेव, नाशिक






खरे प्रेम

बुलढाणा जिल्ह्यातील  चिखली तालुक्यात सध्या एका अनोख्या विवाहाची चर्चा आहे. एका मुलीने हात तुटलेल्या एका तरुणासोबत लग्न केले. आश्‍चर्यचकीत होण्यासारखी गोष्ट तुम्हाला वाटली असेल, पण यात आश्‍चर्य वाटण्यासारखे तिला काहीच वाटत नाही. कारणही तेवढेच विशेष आहे. त्यामुळे बातमी वाचल्यानंतर तुमच्या तोंडातून तिच्यासाठी शब्द बाहेर पडतील... वाहऽऽ याला म्हणतात, धाडसी मुलगी अन् प्रेम!! विवाह या हिंदी चित्रपटाचे कथानकच जणू या ठिकाणी जसेच्या तसे उतरले आहे. फरक इतकाच की तिथे नायकाने धाडस केले आणि इथे या खर्‍याखुर्‍या नायिकेने...

चांधई (ता. चिखली) येथील विशाल दिनकर इंगळे आणि मंगरूळ नवघरे येथील प्रिया अंकुश घेवंदे यांचे तीन महिन्यांपूर्वी लग्न ठरले होते. नव्या वैवाहिक आयुष्याची, संसार फुलविण्याची स्वप्नं दोघांनीही बघायला सुरुवात केली. विशाल ट्रकवर चालक म्हणून काम करत होता. सगळीकडे आनंदीआनंद, दोन्ही कुटुंबाची लग्नाची तयारी सुरू होती. मात्र बहुधा हा आनंद नियतीला बघवला गेला नसावा. लग्न ठरल्यानंतर एकाच महिन्यात विशाल यांचा देऊळगाव महीजवळ भीषण अपघात झाला आणि त्यात त्यांचा डावा हात ट्रकच्या चाकाखाली येऊन चिरडला गेला. त्यांच्यावर औरंगाबाद येथील एमजीएम रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र पूर्णतः निकामी झाल्याने डावा हात तोडावा लागला. वाहनचालक असल्याने ज्या हातांवर पोट होते, तोच हात राहिला नसल्याने आता पुढे काय, असा प्रश्‍न निर्माण झाला.  उदरनिर्वाहाचे एकमेव साधनच हिरावले जाणार होते. आता कमाईचाच प्रश्‍न निर्माण झाला म्हटल्यावर लग्न तर मोडल्यातच जमा होते. मात्र याच काळात वेगळीच कथा जन्म घेत होती. प्रियाला विशालची ओढ लागली होती. तो उपचार घेऊन बरा होऊन येईल, आमचे लग्न होईल, अशी स्वप्ने ती रंगवत होती. रोज विशालला फोन करून तब्येची विचारपूस करायची. मात्र हातच निकामी झाल्यामुळे विशालने काळजावर दगड ठेवून तिला सत्य परिस्थिती सांगितली.
विशालला आता वाहन चालवता येणार नसल्यामुळे प्रियाच्या घरूनही या विवाहाला विरोध सुरू झाला. मात्र दुसरीकडे प्रियाने विशालला कायमचे स्वीकारले होते. तिने विशाललाच आयुष्यभराची साथ देण्याचा निर्णय घेतला. आमचे लग्न झाल्यानंतर हात तुटला असता तर स्वीकारलेच असते ना? लोक चार हातांनी संसार उभा करतात. आम्ही तीन हातांनी संसार उभा करू, असे म्हणत ती घरच्यांना समजावून सांगितली अन् तिच्या या निर्णयापुढे आई- वडिलांनाही नमते घ्यावे लागले. दोन्ही घरच्यांनी पुढाकार घेऊन दोघांचे काल, 27 नोव्हेंबरला मोजक्या नातेवाइकांच्या उपस्थितीत चांधई येथे  हा विवाह लावून दिला. या विवाहाची चर्चा कानावर येताच सारेच थक्क आहेत आणि प्रियाच्या धाडसाचे कौतुक करत आहेत. थोड्याशा स्वार्थापोटी प्रेम अन् कर्तव्य विसरून जाणार्‍या तरुणाईपुढे प्रियाने जणू आदर्शच ठेवला आहे.

देवदिवाळी निमित्त कपालेश्वर महादेवाचा अर्धनारीनटेश्वर शृंगार

 आज कार्तिक पौर्णिमा...

देवदिवाळी ...अर्धनारीनटेश्वर शृंगार ...!
श्री कपालेश्वर महादेव, पंचवटी, नाशिक तीर्थक्षेत्र



नाशिक चा दिघावकर पॅटर्न राज्यभर लागू होणार

बागलाणचे सुपुत्र व नाशिक विभागाचे पोलीस महासंचालक मा. डॉ. प्रतापराव दिघावकर यांच्या शेतकरी फसवणुकी बाबतचा नाशिक पॅटर्न संपुर्ण राज्यात लागु होणार असल्याचे गृहमंत्र्यांनी जाहीर केले आहे.

व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक ही मोठी समस्या होती, दिघावकर साहेबांमुळे  या प्रश्नावर चर्चा सुरू झाली व मार्गही मोकळा झाला  अनेक शेतकऱ्यांना त्यांनी न्याय मिळवून दिला आणि लबाड दलालांना दणका दिला.




Saturday, 28 November 2020

नाशिकचे नितीन भालेराव माओवाद्यांच्या हल्ल्यात शहिद

छत्तीसगड मधील रायपूर येथे माओवाद्यांचा जवानांवर भीषण हल्ला;

नाशिक जिल्ह्यातील रहिवासी CRPF चे सहाय्यक कमांडंट नितीन भालेराव शहिद, ९ जवान जखमी.

#Nashik's Nitin Bhalerao (34), Assistant Commandant CRPF’s elite unit CoBRA succumbed in Raipur, Chhattisgarh..




Friday, 27 November 2020

श्री समर्थ रामदास स्वामी स्थापित गोमय मारुती, टाकळी नाशिक

श्री समर्थ रामदास स्वामी स्थापित गोमय मारुती, टाकळी, नाशिक

समर्थ रामदासांनी स्थापन केलेल्या  मारुतींपैकी असलेला सर्वप्रथम टाकळीचा मारुती. बोहल्यावरून पलायन केल्यावर रामदास स्वामी नाशिकच्या काळाराम मंदिरात आले. तेथे त्यांनी रामाची उपासना सुरू केली. राममंदिरात ५ दिवस ५ रात्र राहिल्यानंतर त्यांना रामाने दृष्टांत दिला आणि सांगितले की, 'गोदावरी, नंदिनी, संगमावर तपश्चर्येला सुरुवात कर' त्यांचा आदेश शिरसावंद्य मानून त्यांनी टाकळीला संगमावर तपश्चयेर्ला सुरुवात केली. तेथेच त्यांना 'श्रीराम जयराम जय जय राम' या मंत्राचे स्फुरण झाले. १६२० मध्ये ते टाकळीला आले. १६२० ते १६३२ पर्यंत त्यांनी १२ वर्षे  गायत्री मंत्र व राम मंत्राचे पुरश्चरण केले. या ठिकाणी त्यांनी १३ कोटी मंत्रांचे पुरश्चरण केले. गोदावरीच्या पाण्यात उभे राहून ‘श्रीराम जयराम जयजय राम’ या मंत्राचा तेरा कोटी जप, दररोज १२०० सूर्यनमस्कार करून त्यांनी मानसिक आणि शारीरिक शक्तीचा विकास केला.

१६३२ मध्ये रामदास स्वामींनी टाकळी सोडून जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा आपला शिष्य उद्धवस्वामी याच्यासाठी या मंदिराची स्थापना केली. मठात असणाऱ्या कपिला गायीच्या शेणापासून या मंदिरातल्या मारुतीची स्थापना करण्यात आलेली आहे.  गुढीपाडवा आणि दिवाळीचा पाडवा या दिवशी दुधात शेंदुर कालवून या मूर्तीला लेप दिला जातो. या मंदिरात राम, लक्ष्मण व सीता यांच्याही मूर्ती आहेत. येथील गाभार्‍याबाहेर एक मोठा सभामंडप आहे. येथे काचेच्या मोठ्या पेटीत रामदास स्वामींची मोठी सुबक मूर्ती आहे. या ठिकाणी दासनवमी आणि हनुमान जयंतीच्या दिवशी मोठा उत्सव असतो. 

नाशिक येथील टाकळी येथील समर्थांनी स्थापन केलेला मठ हा पहिला मठ आहे. त्यामुळे समर्थांच्या टाकळी येथील मठाला रामदासी संप्रदायात फार महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.

सध्या या मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम प्रगतीपथावर आहे.






Corona Update

आज नाशिक जिल्ह्यातील कोरोना रूग्ण संख्येने १ लाखाचा आकडा पार केला.

यापैकी ९५६२६ रूग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली, मात्र १७८२ रूग्ण कमनशिबी ठरले. 

नाशिक रूग्ण बरे होण्याचा दर अद्यापही ९५.४५% आहे. 

#CoronaUpdates #Nashik

Thursday, 26 November 2020

आठवणी २६ नोव्हेंबर च्या ... कहाणी एका अज्ञात नायिकेची

 आठवणी २६ नोव्हेंबर च्या ... कहाणी एका अज्ञात नायिकेची

स्टाफ नर्स अंजली कुल्थे- माझी खरीखुरी सेलिब्रिटी
ही शौर्यकथा आहे, स्टाफनर्स अंजली कुल्थे यांची! अंजलीला आवर्जून आठवायला ती कुणी चकचकीत दुनियेतली हिरॉईन नाही. तिच्या शौर्याची आठवण करून द्यावी लागणं, हेच मन विषण्ण करणारं आहे. अंजली ही सीएसटी स्टेशन जवळच्या कामा व अल्ब्लेस रुग्णालयात रात्री ८ ते सकाळी ८ अशी रात्रपाळी करणारी नर्स. हे स्त्री व बालरुग्णालय असल्यानं प्रसूतिवेदना सुरू झालेल्या बाळंतपणासाठी आलेल्या २० महिला त्यावेळी अंजलीच्या देखरेखीखाली लेबर रूममध्ये आपल्या बाळाच्या जन्माच्या प्रतीक्षेत होत्या. अंजली नेहमीपमिाणे तिची जबाबदारी पार पाडत होती. ती काळरात्र होती, २६ नोव्हेंबर २००८ची! एवढ्यात, मुंबईवर हल्ला करणारा दहशतवादी अजमल कसाब कामा रुग्णालयाच्या परिसरात आल्यानं एकच गोंधळ उडाला. हातात बंदूक घेऊन माथेफिरूसारख्या गोळ्या चालवणाऱ्या, कसाबनं रुग्णालयाच्या सुरक्षारक्षकांनाच गोळ्या घातल्यानं ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यानंतर त्यानं एका नर्सलाही जखमी केलं. ‘आता आपल्यालाही हा गोळ्या घालणार,’ या भीतीनं रुग्णालयातील रुग्ण जीव मुठीत धरून होत्या.
सुरक्षारक्षकांना मारल्यावर तो पहिल्या मजल्यावर येण्याच्या बेतात असतानाच प्रसंगावधान राखून अंजलीनं अक्षरशः एका क्षणात पळतच जाऊन विभागाचे जड दरवाजे कसेबसे बंद केले. तिच्या देखरेखीखाली असलेल्या वीस गर्भवती महिला व त्यांच्या नातेवाइकांना तत्काळ वॉर्डच्या टोकाला असलेल्या पँट्रीमध्ये हलवलं आणि जखमी परिचारिकेला आपत्कालिन विभागात हलवलं. कसलाही आवाज होऊ न देण्याची खबरदारी घेतली. रुग्णालयातील प्रत्येक जीव वाचवण्याची सूत्रंच जणू तिनं हातात घेतली. त्यानंतर वेळ न दवडता तिनं प्रसंगावधान राखून डॉक्टर आणि पोलिसांना फोन करून सावध केलं. या इमारतीच्या खालीच बाँबस्फोटांचे हादरे आणि दहशतवादी व पोलिस यांच्यात गोळीबार सुरू होता. दहशतीच्या वातावरणात रुग्णालयातील प्रत्येकाला धीर देण्याचं, मदत करण्याचं काम ही नर्स मोठ्या धैर्याने करत होती. त्याचदरम्यान प्रसूती करण्यासाठी दोन महिलांना तिनं ताबडतोब दुसऱ्या मजल्यावरील प्रसूति विभागात नेलं. डॉक्टरांनाही प्रसूतीसाठी मदत केली. बाळं सुखरूप जन्माला आली. हे सर्व एकाच ट्यूबच्या उजेडात चालू होतं. कारण खाली तुफान गोळीबार सुरू होता. काही काळानंतर हा आवाज थंडावला; पण ती रात्र वैऱ्याची होती.
या घटनेनंतर महिनाभरात अंजलीनं ओळखपरेडमध्ये कसाबला न घाबरता ओळखलं. ती नर्सच्या गणवेशात गेली आणि त्या गणवेशाची ताकद दाखवली. ती घाबरली नाही, डगमगली नाही, आपल्या जिवाला असलेल्या धोक्याचा तिनं त्यावेळी विचारही केला नाही. तिनं प्रसंगावधान राखलं. स्वतःच्या जबाबदाऱ्या जिवावर उदार होऊन व्यवस्थित पार पाडल्या. तिचे रुग्ण ही तिची जबाबदारी होती. त्यांचा जीव वाचवला. काळजी घेतली. तिचा गणवेश हेच तिचं सामर्थ्य होतं.
त्या दिवशी घाबरून तिनं दरवाजेच बंद केले नसते तर... रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवलं नसतं तर... किंवा दहशतवाद्याला ओळखायला नकार दिला असता तर... पण तिनं केलेलं काम देशासाठी किती मोठं होतं, याची जाणीव आज आपण हरवून बसलोय की काय, असं वाटतंय.
अंजली कुल्थे ही माझ्या मते, आपली खरी सेलिब्रिटी आहे. आमची ही हिरॉईन, काही दीपिका पादुकोन नाही कि झेड सिक्युरिटीच्या गराड्यातली कंगना रणावत नाही . अंजली हीच धैर्यातलं आणि सेवेतलं खरं सौंदर्य असलेली आमची हिरॉईन आहे. माझ्या साठी ती या जगातली सगळ्यात सुंदर स्त्री आहे. पडद्यावरील नायिकां एवढेच २६ नोव्हेंबरच्या रात्री अंजली किंवा तिच्यासारख्याच अनेकांनी दाखवलेलं धैर्यही तेवढंच मोलाचं आहे. कसाबच्या विरोधात ओळख परेड सुरू होती तेव्हा जसा उज्ज्वल निकम यांच्या जिवाला धोका होता तसा शंभर टक्के अंजलीच्या जिवालाही असणार! पण तिनं सिक्युरिटी मागितलेली नाही किंवा तिची तशी अपेक्षाही नाही. अंजली कुल्थे ही कधी पेज थ्री सेलिब्रिटी होणार नाही किंवा माध्यमांमधून तिला पहिल्या पानावर स्थान मिळणार नाही, ना तिला पद्मश्री मिळेल, ना विधानपरिषद मिळेल, ना तिला पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी मिळेल, ना महाराष्ट्रभूषण मिळेल. आपला सन्मान व्हावा, अशी तिची अपेक्षाही असणार नाही. पण ती काळाच्या ओघात विस्मरणात गेली. आपण भारतीय तिच्यासारख्या खऱ्या नायिकेला ओळखू शकत नाही की लक्षात ठेवू शकत नाही.
पण तरीही समाजमन जागं ठेवून आपण अंजली कुल्थेला दीपिका पादुकोन, रिंकू राजगुरूच्या जागी ठेवू तेव्हा या धैर्याने, हजरजबाबीने काम करणाऱ्या वैद्यक क्षेत्रातल्या लेकींना , अहोरात्र रुग्ण सेवा करत नाईटेन्गेलने पेटवलेला सेवेचा धैर्याचा दिवा तेवत ठेवणाऱ्या नर्सेस आणी ब्रदर्स ला समाजमान्यता मिळेल . त्या जेव्हा खऱ्याखुऱ्या हिरॉईन्स म्हणून गणल्या जातील, तेव्हा तुमची पाच वर्षांची मुलगी किंवा मुलगा म्हणेल, ‘आई, मला नर्स व्हायचंय.’, ‘ आई मला ब्रदर व्हायचय”
यानिमित्ताने मी दिवसरात्र डोळ्यांत तेल घालून म्हणजे रात्र रात्र जागून डॉक्टरांपेक्षाही जास्त कष्ट उपसून रुग्णांची शुश्रूषा करणारे देशातील तमाम ब्रदर्स आणि सिस्टर्स यांना मी मानाचा मुजरा करतो.
- डॉ. अमोल अन्नदाते

Wednesday, 25 November 2020

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर केलेली आकर्षक रोषणाई

प्रबोधिनी भागवत एकादशी (कार्तिक एकादशी) च्या पूर्वसंध्येला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर केलेली आकर्षक रोषणाई...


















वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....