श्री गुप्तसर साहेब गुरूद्वारा, मनमाड, नाशिक
आज गुरु परब म्हणजेच श्री गुरु नानक जयंती देशभर हर्षोल्हासात साजरी केली जात आहे. त्यानिमित्तने आज देशभरात प्रसिद्ध असलेल्या मनमाड येथील श्री गुप्तसर साहेब गुरुद्वाराबद्दल जाणून घेऊयात.
या गुरुद्वाराशी संबंधित ऐतिहासिक आख्यायिका थेट शिखांचे १०वे गुरु श्री गोविंदसिंहजी यांच्याशी संबंधित आहे. गुरु श्री गोविंदसिंहजी नांदेडला असताना त्यांनी दोन मराठा सरदार बाळाराव व रुस्तुमराव यांची साता-याच्या अजिंक्यतारा किल्ल्याला शत्रुचा वेढ्यातून सुखरूप सुटका केली व त्यांना मनमाडला आणले व याठिकाणी ठेवले.
त्यानंतर, बाबा निधानसिंग यांनी सन १९३१ मध्ये कारसेवेद्वारा याठिकाणी गुरुद्वाराचे बांधकाम सुरु केले. बांधकाम सुरु असताना अत्यंत गोड व मधुर स्वादाचे पाणी असलेली एक गुप्त विहीर सापडली. हा शुभशकून समजून या गुरुद्वाराचे नाव श्री गुप्तसार साहेब गुरुद्वारा असे ठेवण्यात आले. अतिशय भव्य व सुंदर अशा या गुरुद्वाराला भेट देण्यासाठी सर्व जगभरातून शीख भाविक दर्शन घेण्यासाठी येत असतात. लॉकडाऊनच्या काळात या गुरुद्वाराच्या लंगरच्या माध्यमातून दररोज १५००० जणांना अन्नदान करण्यात आले.
The historical connection of Manmad is to the tenth Guru, Shri Guru Gobind Singh Ji who during his stay at Nanded, secured the release of two Maratha chiefs- Bala Rao and Rustom Rao from the Satara Fort and brought them to Manmad.
Baba Nidhan Singh started karseva for construction of this Gurudwara in 1931. A hidden well was found with sweet water, because of which the Gurudwara was named Gurudwara Guptsar Sahib
A large two-storeyed entrance gated leads to the courtyard. To the left is the large diwan hall with walls decorated with multicoloured glass pieces and reflective mirrors arranged in geometrical patterns.
No comments:
Post a Comment