Sunday, 18 October 2020

नाशिकची "चित्रादेवी"

 "चित्रादेवी"

नाशिक हे नऊ टेकड्यांवर वसलेले गाव आहे हे आपण सर्वचजण जाणतो. त्या नऊ टेकांपैकीच एक म्हणजे चित्रघंटा टेक.जुन्या नाशकातील नाव दरवाजा भागात हा चित्रघंटा टेक आहे. तेथे सर्वात उंचावर चित्रादेवी मंदिर आहे.नवदुर्गांमधील तिसरी देवी म्हणजे चंद्रघटीका.तिचेच हे रुप.हे स्थान किमान दोनशे वर्षापुर्वीपासुनचे आहे. असे सांगितले जाते की.. या भागात पुर्वी सरोवर होते.आणि त्याकाठी हे मंदिर होते. कालांतराने सरोवर बुजले गेले आणि त्यावर लोकांनी आपली घरे वसवली. आजही त्याभागातील केवळ पावसाळ्यात नाही तर वर्षभरात ओल आलेली जाणवते. मंदिरासमोर राहणारे बोराडे कुटुंबीय सांगतात की.. रात्री झोपल्यावर जमीनीखालुन पाण्याचा खळखळ आवाज जाणवतो.काहींच्या मते या मंदिराखाली पाण्याचे झरे आहेत. आणि येथील पाणी रोकडोबा मारुती मंदिराजवळ अजुनही असलेल्या जनावरांच्या पाणपोईत प्रकट होते.

परिसरातील नागरिक या देवीची एक आख्यायिका सांगतात.घरात मंगलकार्य निघाल्यावर लग्नपत्रिका मंदिरात ठेवली जाई.दुसऱ्या दिवशी देवीपुढे नववधुस संसारोपयोगी वस्तुंचा आहेर प्रकट झालेला असे.

पांढऱ्या शुभ्र संगमरवरात ही दिड फुटी सुबक मुर्ती घडवली आहे. मुर्तीला सहा हात असुन प्रयत्न हातात शस्त्रे आहेत.

दोनच वर्षापूर्वी स्थानिक नगरसेवक शाहु खैरे यांच्या पुढाकाराने मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला.पुर्णपणे घडीव दगडात हे बांधकाम करण्यात आले.

सुनील शिरवाडकर.
९४२३९६८३०८.







No comments:

Post a Comment

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....