#कामाक्षी_माता मंदिर #कावनई ता. इगतपुरी जि. नाशिक
#Kamakshi_Mata_temple, #Kavnai, district Nashik
It is one of shakteepeeth amongst four shaktipeeths of Kamakshi Mata viz. Kanchipuram, Gouhatti, Kavnai and Karanjgoan (Shegaon).
It is said that Mother Goddess Parvati wanted to examine the desire of Prabhu ShriRam after Ravana kidnapped Mata Sita; but Prabhu ShriRam identified Mata Parvati and requested her to stay at this place to fulfill the prayers of devotees. Thus Mata Parvati stayed at this place as Kamakshi Maata.
कावनईच्या किल्ल्याच्या पायथ्याशी कपिलधारा तीर्थाजवळच श्री कामाक्षी माता मंदिर आहे. या मंदिराचे पौराणिक माहात्म्य मानले जाते.
सदरचे कामाक्षी देवी मंदिर हे पौराणिक महात्म्य लाभलेले भारतातील ४ शक्तीपीठापैकी तिसऱ्या क्रमांकाचे शक्तीपीठ मानले जाते. भारतात कामाक्षी मातेचे कांचीपुरम, गौहाती,कावनई आणि करंजगाव ( शेगाव ) ही ४ शक्तीपीठे मानलेली आहेत. या शक्तीपीठात दूरदूरवरून असंख्य भाविक नवसपूर्तीसाठी येत असतात.
या शक्तीपीठामागे प्रचलित असलेली आख्यायिका अशी आहे की द्वापार युगात रामायणकाळात प्रभु श्रीराम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधासाठी जात असताना सध्याच्या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद येथे पक्षीराज जटायू जखमी अवस्थेत मिळून आला. जटायुच्या प्राणोत्क्रमणानंतर त्याचा उद्धार करून प्रभू श्रीराम हे दंडकारण्यात सीतेचा शोध घेत आले. त्याच वेळेस कैलास पर्वतावर भगवान शंकराचा श्रीराम हा जप सुरु असताना माता पार्वती शंकरास म्हणाली जो राम आपल्या पत्नीचा सांभाळ करू शकत नाही, त्या रामाचे ध्यान तुम्ही का करता ? यावेळी शंकराने उत्तर दिले की, जो विचार तुझा आहे तो चुकीचा आहे. तू रामाची परीक्षा घेवू शकतेस. त्या वेळेस या दंडकारण्यात माता पार्वती सीतेच्या रुपात येवून रामाला मोहित करू लागली. तेंव्हा श्रीरामाने माता पार्वती मातेला ओळखून दंडवत घातले. माता पार्वतीने प्रसन्न होऊन रामास पुढील मार्गदर्शन केले व कैलास पर्वतावर परतू लागली. तेव्हा भक्तांसाठी कामाक्षी देवीच्या रूपात इथेच रहावे असा हट्ट श्रीरामाने माता पार्वतीकडे धरला. म्हणून माता पार्वती या ठिकाणी कामाक्षी मातेच्या रुपाने राहिली. रामाची काम इच्छा बघण्यासाठी आलेली ही कामाक्षी माता असा वाल्मिकी रामायणात उल्लेख आढळतो.
मराठेशाहीमध्ये अत्यंत महत्वाच्या युद्धात विजयश्री खेचून आणली म्हणून नानासाहेब पेशव्यांनी नवसपूर्तीसाठी कामाक्षी देवीला सोने आणि चांदीचे अलंकार अर्पण केले होते असा उल्लेख पेशवे बखरमध्ये आहे असे म्हणतात. मंदिराकडे आजही हे दागिने उपलब्ध असून ते अलंकार देवीच्या मूर्ती वर दर नवरात्रोत्सवात आणि चैत्र पौर्णिमेला चढवले जातात.
अशी ही भक्तांची इच्छापूर्ती करणारी कामाक्षी माता सुविख्यात आहे.
No comments:
Post a Comment