Vintage photograph of Godavari river at Tryambakeshwar
Vintage photograph of Godavari river at Tryambakeshwar
अक्कलकोट येथे असलेले हे मंदिर १६ व्या शतकातील आहे असे सांगितले जाते. खुद्द रामदास स्वामींनी या मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे, असे मानतात. विशेष म्हणजे हा मारुती मानवी चेहऱ्याचा आहे. सर्वत्र शेंदरी रंगाचे मारुती पाहायला मिळतात परंतु येथील मारुतीची मूर्ती काळ्या पाषाणातून बनवलेली असून या मूर्तीला शेंदूर लेपन केले जात नाही, त्यामुळे ही मूर्ती काळ्या रंगाची आहे. मूर्तीचा उजवा हात अभय मुद्रेत आहे व तो आशीर्वाद देत आहे. मंदिराच्या खाली तळघर आहे ज्या ठिकाणी स्वामी समर्थांचे प्रमुख भक्त श्री. बाळप्पा महाराज यांनी तपश्चर्या केली. याच तपोभूमीत श्री स्वामी समर्थांच्या पादुका आहेत.
होरास वॅन रुथ या पाश्चात्य चित्रकाराने सन १८८३ मध्ये काढलेले हे चित्र.
या चित्राचे वर्णन करताना त्याने हे चित्र त्र्यंबकेश्वराच्या मंदिरातील पुजा करणारे भक्त असे केले असले तरी हे या चित्रात चितारलेले दृष्य मात्र नाशिकच्या गोदाकाठचे आहे असे वाटले.
Painting by Horace van Ruith (1839 – 1923) Worshipers at the Trimbakeshwar Temple in the town of Trimbak, in the Nasik District of Maharashtra dedicated to Lord Shiva.
However, the scene depicted in above painting seems to be on the banks of Godavari river at Panchvati, Nashik
नाशिकला थंडीची चाहूल
उन्हाचा चटका आणि अंगातून घामाच्या धारा काढणाऱ्या ‘ऑक्टोबर हीट’ला वगळून यंदा थंडीची चाहूल लागली आहे. संपूर्ण ऑक्टोबर ढगाळ वातावरण आणि बंगालच्या उपसागरातून आलेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे यंदा हा बदल जाणवला आहे.
राज्यात आता सर्वदूर कोरडय़ा हवामानाची स्थिती आहे. त्यातच उत्तरेकडील राज्यातून थंड वाऱ्यांचे प्रवाहही सुरू झाले आहेत. त्यामुळे किमान तापमानात घट होऊन थंडी वाढत जाईल, असा अंदाज हवामान अभ्यासकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
पावसाच्या हंगामातील चार महिन्यांचा काळ संपल्यानंतर ऑक्टोबरच्या साधारणत: दुसऱ्या आठवडय़ानंतर ढगाळ स्थिती दूर होऊन उन्हाचा चटका आणि उकाडा जाणवतो. राज्यात अनेक ठिकाणी दिवसाच्या कमाल तापमानाचा पारा ३६ ते ३८ अंश सेल्सिअस किंवा त्यापुढेही जातो. हा कालावधी ‘ऑक्टोबर हीट’ म्हणून परिचित आहे.
जून ते सप्टेंबर हा मोसमी पावसाचा मुख्य कालावधी संपल्यानंतर राज्यात ढगाळ स्थिती कायम होती. त्यातच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा तीव्र पट्टा निर्माण झाला आणि त्याने महाराष्ट्रातून प्रवास केला. त्याचा परिणाम म्हणून राज्याच्या बहुतांश भागात धुवाधार पाऊस झाला. काही भागांत अतिवृष्टीची नोंद झाली. ऑक्टोबरमध्ये राज्यात सरासरीपेक्षा ७५ टक्क्यांनी अधिक पाऊस झाला. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवासही थांबला होता. कमी दाब क्षेत्राचा प्रभाव ओसरल्यानंतर हा प्रवास सुरू होऊन २८ ऑक्टोबरला महाराष्ट्रासह देशातून मोसमी वारे निघून गेले. त्यामुळे ढगाळ स्थिती निवळून हवामान कोरडे झाले. तोवर ऑक्टोबर महिना सरत आला आणि उत्तरेकडून थंड वारेही सुरू झाले. परिणामी ऑक्टोबर हीट वगळून राज्याला थंडीची चाहूल लागली.
कारण काय?
हंगामाच्या पावसाची समाप्ती आणि थंडीची चाहूल लागण्याच्या कालावधीतील ‘ऑक्टोबर हीट’चा कालावधी यंदा निर्माण झालाच नाही. लांबलेला पाऊस आणि ढगाळ हवामानाची स्थिती ही कारणे त्यासाठी सांगितली जात आहेत. सध्या बहुतांश ठिकाणी रात्रीच्या किमान तापमानात घट नोंदविली जात आहे.
ऑक्टोबरमध्ये ढगाळ वातावरण आणि पावसामुळे तापमानात मोठी वाढ होऊ शकली नाही. त्यामुळे उकाडा जाणवला नाही. सध्या अवकाळी पावसाची शक्यता नाही, आकाश निरभ्र झाले आहे. उत्तरेकडील राज्यातील तापमानात घट होत आहे. त्यामुळे आपल्याकडे थंडीची चाहूल लागली आहे. हा वादळांचा कालावधी आहे.
– डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी, ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ
हुला हूप हा क्रिडाप्रकार अतिशय अवघड मानला जातो.
पंडित जवाहरलाल नेहरु वनौषधी उद्यान (नेहरु बोटॅनिकल गार्डन), नाशिक
पांडव लेण्यांच्या पायथ्याशी व नाशिक शहराच्या प्रवेशद्वारावर असलेले पंडित जवाहरलाल नेहरू वन उद्यान हे त्यामध्ये असलेल्या हजारो जातींच्या वनौषधी व आयुर्वेदिक औषधांच्या झाडांनी नुसतेच नाशिकमध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. पं. जवाहरलाल नेहरू वन उद्यान नाशिककरांसाठी बॉटनिकल गार्डन म्हणूनदेखील प्रसिद्ध आहे. ते केवळ वन उद्यानच नव्हे तर आता मनोरंजन पार्क म्हणून ही प्रसिद्ध पावते आहे.
फुलपाखराच्या आकाराचे आकर्षक व भव्य प्रवेशद्वार असलेले हे उद्यान त्याच्या विविध वैशिष्ट्यांमुळे एकमेवाद्वितीय ठरले आहे. १३ हेक्टरच्या विस्तीर्ण जमीनीवर पसरलेल्या या उद्यानात ठिकठिकाणी वनौषधींची माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत. उद्यानास भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांना बसण्यासाठी फुलपाखरांच्या प्रतिकृतीची बाके ठेवण्यात आली आहेत. बाळ्-गोपाळांच्या मनोरंजनासाठी विविध प्रकारची खेळणी व फायबरच्या प्राण्यांच्या प्रतिकृती विविध ठिकाणी मांडण्यात आल्या आहेत. मात्र या सर्वात जास्त आकर्षणाचे केंद्र थरले आहे ते 'कथा अरण्याची' या नावाने सादर होणारा लेझर शो. या शोमध्ये झाडे आपल्यावर ओढवलेल्या आपत्तीची कथा सांगतात व शेवटी सर्व प्रेक्षकांना वृक्षसंवर्धनासाठी भावनिक साद घालतात. ही बोलकी झाडे प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहतात. टाटा ट्रस्टच्या माध्यमातून या वन उद्यानाचा कायापालट झाला आहे. उद्यानातल्या रस्त्यांच्या कडेला अनुरुप असे बांबुचे कुंपन घालण्यात आले आहे.
या उद्यानात वनौषधी तसेच आयुर्वेदिक औषधी यांच्यासह मूळच्या भारतातील नसलेल्या परंतु इकडेच रुळलेल्या विदेशी वनस्पतीदेखील आहेत. त्यासोबतच द्राक्ष ते रूद्राक्ष फळ संस्कृती जोपासणारी फळ वृक्षांचीदेखील लागवड करण्यात आली आहे. या ठिकाणी कपिला, शिवण, कुचलाकाजरा, रूद्राक्ष, द्राक्ष, सीताफळ, केसरी, मोह, कवट, तेंदू, हिरडा, आवळा, रामफळ, हनुमान फळ, फणस, जांभूळ, आंबा, काजू, बिब्बा आदी शेकडो प्रकारची फळझाडे आहेत.
नाशिक जिल्ह्यातील वन्य प्रदेशात तसेच इतर क्षेत्रात लक्षणीय ठरतील अशा सपुष्प वनस्पतींची संख्या हजाराहून अधिक आहे. त्यापैकी काही स्थानिक प्रजाती उद्यानातील कुसुमाकर, अशोक वन, चंपक वन व मकरंद वन या विभागात संवर्धित करण्यात आल्या आहेत. यामध्ये पांढरा सिरस, बहवा, काटे साबर, नागकेसर, पळस, धामण, सातवीणा, अशोक, सीतेचा अशोक, झारूल, करंज, वारस, सोनचाफा, कदंब, बोंडारा, पांढरा चाफा, कांचन, शिरीष, पागारा आदी विविध प्रकारचे पुष्प-वृक्षवल्ली संवर्धित करण्यात आली आहे.
या ठिकाणी छोट्या-मोठ्या पक्ष्यांसाठी आवडते फळ खाद्य देणार्या वनस्पतींचे वन ‘सारिका बाग’ या नावाने संवर्धित करण्यात आले आहे. यामध्ये बोर, चिंच, उंबर, वड, मनीकरा, सिंगापूर चेरी, पेरू, डाळिंब, तोरण, घाणेरी, असाना, आळू, करवंद, भुवकेश, विलायती चिंच आदी प्रकारची शेकडो फळझाडे लावण्यात आल्याने पक्ष्यांचा चिवचिवाट या ठिकाणी सदैव ऐकायला मिळतो.
सह्याद्री श्रेणीतील डोंगर रांगा व संलग्न परिसरात आढळणारी बहुमोल औषधी वनस्पती या ठिकाणी लागवड करण्यात आल्या आहेत. शरीरातील विविध व्याधी कमी करण्यासाठी किंवा मिटवण्यासाठी या वनौषधींची मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लागवड केल्याने राज्यभरातून बरेच जण या ठिकाणी येथील दशमुळी नेण्यासाठी येतात. यामध्ये बेल-बिल्व, शिवण-काश्मिरी, पाडळ, टेटू, श्वोनक, टाकळी-ऐरण, अग्निमंथ, पीठवण-पृश्नपर्णी, सालवण, चिंचार्डी-बृहत, भुई रंगणी-कंटकारी, गोखरू आदी प्रजाती या ठिकाणी आढळून येतात.
या ठिकाणी आराध्य वृक्ष रूद्राक्ष, वड, उंबर, बेल, कदंब, कैलासपती, चंदन, पिंपळ, अश्वत्थ, आंबा, अंजरी, डाळिंब, खजूर, साधा चाफा, ऑलिव्ह, सिडार, ओक, सोनपिंपळ, बदाम, आपटा, कांचन, पचनार, काटे सावर, बखुल, साल आदी हजारो प्रजातींचे वृक्ष आढळून येतात.
या उद्यानाचा विकास झाला आणि या ठिकाणी शहरातूनच नव्हे तर राज्यभरातून येणार्या पर्यटकांची गर्दी वाढत आहे.
१२८ वर्षांपूर्वी म्हणजेच इसवी सन १८९२ मध्ये काढलेले रामकुंड परिसर, नाशिक चे छायाचित्र
128 years old photo of Ramkund area at #Nashik was taken in 1892 AD.
केरळमध्ये नवरात्र साजरी करण्याची ही अनोखी परंपरा.
या शोभायात्रेत नवदुर्गांसमवेत इतर प्रमुख देवताही आपापल्या वाहनांसहित सहभागी झालेल्या दिसत आहेत.
दादासाहेब फाळके स्मारक
भारतातले पहिले चित्रपटकार दादासाहेब फाळके याच्या स्मृतीप्रित्यर्थ पांडवलेणी, नाशिक या स्थळाच्या पायथ्याशी दादासाहेब फाळके स्मारक हे उद्यान उभारले आहे. यामध्ये चित्रपट संगिताच्या तालावर नाचणारी कारंजी हे आकर्षण आहे. शिवाय येथे एक संग्रहालय असून, मुक्त रंगमंचाचीही सोय आहे.
दादासाहेब फाळकेंनी सिनेमासृष्टीची मुहूर्तमेढ रोवली ती नाशिकमध्येच. त्यांच्या कार्य स्मरणार्थ हे फाळके स्मारक उभारले गेले आहे. पांडव लेण्यांच्या पायथ्याशी असलेल्या विस्तीर्ण परिसरात फाळके स्मारक, पुराणवस्तू संग्रहालय, बौध्द स्मारक, वॉटर पार्क या वास्तु एकवटल्या आहेत. दादासाहेब फाळकेंशी संबंधित चित्रपटसृष्टीचा इतिहास, प्रमुख घटना फोटोग्राफस व टिपणांच्या सहाय्याने येथे सुबकपणे मांडल्या आहेत. त्यातुन फाळकेंचे कष्टमय जीवनही उलगडते. दुसर्या एका दालनात चांगले पुराणवस्तू संग्रहालय आहे. हे संग्रहालय आधी नाशिक शहरातच होते. इ.स.२००१ मध्ये येथे स्थलांतरीत केले गेले. मराठा-मोगल काळातील लढाईची हत्यारे, जुनी दुर्मिळ छायाचित्रे, जुने शिलालेख, काही मूर्त्या, छोट्या-मोठ्या सुमारे १००० मुर्त्या तरी येथे आहेत. हे संग्रहालय म्हणजे भूतकाळात एक फेरफटका मारण्याचे साधन होय. येथील उद्यान व वॉटर पार्क मनोरंजनासाठी प्रसिध्द आहेत.
Dadasaheb Phalke Smarak spread across a vast extend of 29 acres, and it holds a pretty garden in its courtyard. Placed in the pretty surroundings of a majestic Pandava caves, Dada Saheb Phalke Smarak is one among the busiest attractions in Nasik
It demonstrates the Indian Cinema history with pictures.
Also, in the evening, Light & sound show is played on hindi songs. Garden is beautiful & this spot is busiest tourist spot in Nashik. You can also enjoy the scenic view of Pandavleni.
#आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....