मानवी चेहऱ्याची मूर्ती असलेले श्री हक्क्याचे मारुती मंदिर, अक्कलकोट.
अक्कलकोट येथे असलेले हे मंदिर १६ व्या शतकातील आहे असे सांगितले जाते. खुद्द रामदास स्वामींनी या मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे, असे मानतात. विशेष म्हणजे हा मारुती मानवी चेहऱ्याचा आहे. सर्वत्र शेंदरी रंगाचे मारुती पाहायला मिळतात परंतु येथील मारुतीची मूर्ती काळ्या पाषाणातून बनवलेली असून या मूर्तीला शेंदूर लेपन केले जात नाही, त्यामुळे ही मूर्ती काळ्या रंगाची आहे. मूर्तीचा उजवा हात अभय मुद्रेत आहे व तो आशीर्वाद देत आहे. मंदिराच्या खाली तळघर आहे ज्या ठिकाणी स्वामी समर्थांचे प्रमुख भक्त श्री. बाळप्पा महाराज यांनी तपश्चर्या केली. याच तपोभूमीत श्री स्वामी समर्थांच्या पादुका आहेत.
No comments:
Post a Comment