Tuesday, 27 October 2020

दादासाहेब फाळके स्मारक

दादासाहेब फाळके स्मारक


भारतातले पहिले चित्रपटकार दादासाहेब फाळके याच्या स्मृतीप्रित्यर्थ पांडवलेणी, नाशिक या स्थळाच्या पायथ्याशी दादासाहेब फाळके स्मारक हे उद्यान उभारले आहे. यामध्ये चित्रपट संगिताच्या तालावर नाचणारी कारंजी हे आकर्षण आहे. शिवाय येथे एक संग्रहालय असून, मुक्त रंगमंचाचीही सोय आहे.

दादासाहेब फाळकेंनी सिनेमासृष्टीची मुहूर्तमेढ रोवली ती नाशिकमध्येच. त्यांच्या कार्य स्मरणार्थ हे फाळके स्मारक उभारले गेले आहे. पांडव लेण्यांच्या पायथ्याशी असलेल्या विस्तीर्ण परिसरात फाळके स्मारक, पुराणवस्तू संग्रहालय, बौध्द स्मारक, वॉटर पार्क या वास्तु एकवटल्या आहेत. दादासाहेब फाळकेंशी संबंधित चित्रपटसृष्टीचा इतिहास, प्रमुख घटना फोटोग्राफस व टिपणांच्या सहाय्याने येथे सुबकपणे मांडल्या आहेत. त्यातुन फाळकेंचे कष्टमय जीवनही उलगडते. दुसर्‍या एका दालनात चांगले पुराणवस्तू संग्रहालय आहे. हे संग्रहालय आधी नाशिक शहरातच होते. इ.स.२००१ मध्ये येथे स्थलांतरीत केले गेले. मराठा-मोगल काळातील लढा‌ईची हत्यारे, जुनी दुर्मिळ छायाचित्रे, जुने शिलालेख, काही मूर्त्या, छोट्या-मोठ्या सुमारे १००० मुर्त्या तरी येथे आहेत. हे संग्रहालय म्हणजे भूतकाळात एक फेरफटका मारण्याचे साधन होय. येथील उद्यान व वॉटर पार्क मनोरंजनासाठी प्रसिध्द आहेत.

Dadasaheb Phalke Smarak spread across a vast extend of 29 acres, and it holds a pretty garden in its courtyard. Placed in the pretty surroundings of a majestic Pandava caves, Dada Saheb Phalke Smarak is one among the busiest attractions in Nasik

It demonstrates the Indian Cinema history with pictures.

Also, in the evening, Light & sound show is played on hindi songs. Garden is beautiful & this spot is busiest tourist spot in Nashik. You can also enjoy the scenic view of Pandavleni.















No comments:

Post a Comment

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....