सुंदर नारायण मंदिर, नाशिक
मंत्रभूमी म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये विशिष्ट बांधकाम शैलीतील अनेक ऐतिहासिक पुरातन मंदिरे आहेत. कालौघात तसेच पर्यावरणातील काही बदलामुळे काही मंदिरांची झीज सुरू झाली आहे. या मंदिरांच्या यादीत पुरातन काळातील अहिल्यादेवी होळकर पुलालगत असलेल्या श्री सुंदर नारायण मंदिराचा समावेश आहे. संपूर्ण काळ्या पाषाणात दगड, चुना, शिसव, नवसागरचा वापर करून हे मंदिर १७५६ साली बांधण्यात आले आहे. सुंदरनारायण मंदिर पुर्वाभिमुख आहे. चौथर्यावर हे मंदिर वसले आहे. 20 मीटर उंचीवर वसलेले मंदिराचे शिखर दुरुनही लक्ष वेधून घेते. या शिखराचे वैशिष्ट्य म्हणजे मुख्य कलशाच्या खालच्या बाजूला अनेक उपशिखरं उतरत्या क्रमाने रचली आहेत. सभामंडपाचा घुमटही वैशिष्ट्यपूर्ण आहे. उभ्या आणि आडव्या रेषांनी सजवलेला हा घुमट आकर्षक दिसतो.या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सभामंडपाच्या बाजूने असलेल्या मोकळ्या जागेत तिन्ही बाजूंना ह्या छत्र्या आहेत. ह्या छत्र्यांवर सुंदर नक्षीकाम केले आहे.
मंदिरामध्ये विष्णूची मुर्ती मध्यभागी असून त्याच्या आजूबाजूला वृंदा आणि लक्ष्मी यांच्या मुर्ती आहेत.
या मंदिराबाबत एक पौराणिक कथा सांगितली जाते की वृंदा ही जालंधर नावाच्या असूराची पतिव्रता पत्नी होती. वृंदेच्या पतिव्रत्येमुळे जालंधर अजिंक्य झाला होता. विष्णूंनी जालंधराचा वध करण्यासाठी वृंदेचे पतिव्रत्य भंग केले. जेव्हा हे तिला कळले तेव्हा तिने विष्णूला मन:शांती नष्ट होण्याचा शाप दिला. परिणामी तिच्या शापाने भगवान विष्णूंना कृष्णवर्णरूप प्राप्त झाले. (त्याला आपण शालिग्राम म्हणतो.) या शापातून नष्ट होण्यासाठी श्री विष्णू नाशिकला बद्रिकाश्रमात आले. तिथल्या तीर्थावर स्नान करुन शापमुक्त झाले व आपले रूप पूर्ववत प्राप्त करून घेतले व तेथेच वास्तव्य केले. त्याच ठिकाणी या मंदिराची स्थापना करण्यात आली व भगवान विष्णूंचे हे रूप सुंदरनारायण म्हणून प्रसिध्द झाले.
सोळाव्या शतकात हे मंदिर औरंगजेबाने उध्वस्त करून तेथे थडगे बांधले होते, मात्र पेशव्यांच्या आज्ञेवरून १७५६ मध्ये सरदार गंगाधर यशवंत चंद्रचुड यांनी ते थडगे काढून तेथे सध्याचे भव्य मंदिर पुन्हा बांधले. दिशासाधन करून बांधलेल्या व पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराचे वैशिष्टय म्हणजे विषुवदिनाच्या दिवशी म्हणजे २० व २१ मार्च रोजी सूर्याचे किरण विष्णूच्या मूर्तीच्या चरणावर पडतात.
कपालेश्वर आणि सुंदरनारायण ही मंदिरे अशा पद्धतीने समोरासमोर बांधली आहेत की एका मंदिरातून दुसर्या मंदिरातल्या देवाचे दर्शन घेता येते. कार्तिक शुद्ध त्रयोदशीला हरीहर भेट सोहळा होतो. हरीहर भेट सोहळा नाशिकच्या गोदातीरावर वसलेले श्री कपालेश्वर भगवान आणि श्री सुंदरनारायण भगवान यांच्या मध्ये होतो. भगवान श्री कपालेश्वर यांच्या चांदीच्या मुखवटयाला अश्या पद्धतीने सजवले जाते की अर्धी प्रतिकृती भगवान श्री शंकराची आणि अर्धी प्रतिकृती ही भगवान श्री विष्णूची असते. भगवान श्री शंकराच्या प्रतिकृती ला भगवान श्रीविष्णूंचे गंध लावले जाते तर भगवान श्री विष्णूंच्या प्रतिकृतीला भगवान श्री शंकराचे गंध लावले जाते. श्री कपालेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात श्री विष्णूंच्या प्रतिमेला बेल वाहला जातो तर भगवान श्री शंकराच्या प्रतिमेला तुळस वाहिली जाते. ह्या भेटी मधून श्री शिवशंकर भगवान (हर) आणि श्री विष्णू भगवान (हरी) हे वेगळे नसून एकच आहे हा संदेश दिला जातो.
कार्तिक पौर्णिमेला मंदिरात दिव्यांची आरास करण्यात येते. नदीकडे उतरणार्या पायर्या आणि मंदिरावर लुकलुकणारे असंख्य दिवे बघतांना मन हरखून जाते. दिव्यांची ही आरास पेशव्यांच्या काळापासून अखंडपणे सुरु आहे. स्थापत्यशैलीचा आणि नक्षीकामाचा उत्कृष्ट नमुना असलेले सुंदरनारायण मंदिर नाशिकला भेट दिली तर आवर्जून बघितले पाहिजे असेच आहे!
The Sundarnarayan temple is built by Gangadhar Yashwant Chandrachud in 1756 at a distance of 1 km from Central Bus Stand. The entrance of the temple is to the East. The architecture is attractive and the round dome is made by little ornamental cordons. The arched recesses are impressions of Mughal sclupture. The main deity is of Lord Vishnu - also called Narayana. To the left and right are Laxmi and Saraswati respectively. Fine design is carved on the stones of the temple. On the road leading towards Godavari River there is Badarika Sangam Pond. It is said that the king of Devgiri bathed and performed rites in this pond. We also find a mention of this pond in the holy book Dnyaneshwari. One remarkable thing about this temple is that it is built at such an angle that on 21st March, rays of the rising Sun first fall exactly upon the idols.
No comments:
Post a Comment