श्री त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पूर्व दिशेच्या दर्शनबारीच्या समोर निर्माण करण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज व श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचे स्मृतीस्थळ.
सुरतेवर दुसऱ्यांदा स्वारीसाठी जाताना ३१ डिसेंबर १६६३ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्र्यंबकराजाला अभिषेक करून दर्शन घेतले होते व हा परिसर मुघलांच्या ताब्यातून सोडवण्याचा संकल्प केला होता, तर श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी मुघल बादशहा औरंगजेब याने विध्वंस केलेल्या जुन्या त्र्यंबकेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करून सध्याच्या मंदिराची उभारणी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज व पेशवे यांचे एकत्रित असलेले हे कदाचित पहिलेच व एकमेव स्मारक असावे.
हा सर्व इतिहास श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग दर्शनासाठी आलेल्या भक्तांना मंदिरात जाण्यापूर्वीच या स्मृतिस्थळाचे दर्शन घेताना ज्ञात होत आहे.
No comments:
Post a Comment