पाळणा हा मराठी भाषेचा एक वैशिष्ट्यपूर्ण गीतप्रकार आहे. शेकडो वर्षांपासून मराठी माता भगिनींनी हि लोककला जोपासली व वृद्धिंगत केली आहे. राम, कृष्ण इ. विविध देवदेवतांचे पाळणे सर्वांनाच परिचित आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा ही प्रसिद्ध आहे.
महाराष्ट्रात जसा बाळाचा पाळणा किंवा अंगाई गीत असते तसेच गुजरात मध्ये हालरडू म्हटले जाते. प्रसिध्द गुजराथी कवी झवेरचंद मेघाणी यांनी शिवरायांचा पाळणा म्हणजे शिवजीनू हालरडू हे गीत लिहिले आहे. यांचा जन्म १७ आँगस्ट १८९७ चोटीला गुजरात चा. थोडक्यात हा शिवाजी महाराजांचा गुजराथी भाषेतील पाळणा म्हणता येईल.
आज शिवजयंतीनिमित्त पाहुयात हा गुजराथी पाळणा...
आभमां ऊगेल चांदलो ने,
जिजाबाईने आव्या बाळरे
बाळुडाने माता हींचोळे,
धणनना डुंगरा बोले,
शिवाजी ने निंदरू ना आवे,
माता जिजाबाई झुलावे......
अर्थ :- आभाळात चंद्र उगवला आहे नी जिजाऊ साहेबांनी एका सुंदर राजकूमाराला जन्म दिला. या बाळाला आऊसाहेब पाळ्यात झोके देत आहे, पण बाळ शिवबाला झोप काही येत नाही कारण बाहेर गुलामगीरीच्या अंधारात बुडालेल्या डोंगरांचा घणघणाट होत आहे.
पेटमां पोढीने सांभळेली बाळे,
राम-लक्षमणनी वात
माताजीने मुख जे दीथी,
ऊडी एनी उंघ ते दीथी.....
अर्थ :- पोटामध्ये असतना मातेच्या मुखातून राम-लक्ष्मणाच्या शौर्य कथा ऐकल्या होत्या आणि त्या दिवसापासूनच या बाळ शिवबाची झोप ऊडाली होती.
पोढजो रे, मारां बाळ !
पोढीलेजो पेट भरीने आज
काले काळा युध खेलासे
सुवाताणू ख्याल न रहेशे......
अर्थ :- बाळा झोपून घे रे आज पोट भरून जोझोप . कारण उद्या घनघोर युद्ध खेळायला जाशील तेंव्हा तू तूझी झोप विसरून जाशील. झोपायचे लक्षातही राहणार नाही.
धावजो रे मारा पेट,
धावी लेजो खुब ध्रुपीने आज,
रेहेशे नही रणघेलुजा !
खावा मिठी धाननी वेळा......
अर्थ : बाळा आज तू पोट भरून खाऊन घे, उद्या तू मोठा होशील तेव्हा तू युध्द खेळायला गेल्यावर जेवायची उसंतही नसेल तसेच जेवणात गोड धोड ही नसेल.
पेर ओढी लजो पातळा रे !
पीला, लाल, पीरोजी चीर,
काया तारी लोही मा नहशे,
दखन तेडी धालनू थासे......
अर्थ :- आज लाल पिवळ्या रंगाचे, जरीची सुंदर कापडे घाल, उद्या तुझे शरिर शत्रूच्या रक्ताने माखेल आणि अंगावर वस्त्र म्हणून ढाल लावावी लागेल.
घूघरा, घावणी पोपट-लाकडी
फेरवी लेजो आज,
ते दी तारे हाथ रहेवानी
राती बंबोळ भवानी....
अर्थ :- घुघरा, धावणी, लाकडी पोपट याने आज मनसोक्त खेळून घे, नंतर बाळा तुला भवानी तलवार हातात घ्यावी लागेल.
लाल कंकु केरा चांदला ने
ताणजो केसरा आड्या,
ते दी तो सिंदोरीया थापा,
छाती माथे झीलवा बापा.....
अर्थ :- आज मी लाल कुंकवाची चंद्रकोर तुझ्या कपाळावर लावत आहे पण नंतर तू मोठा झाल्यावर तुझ्या विजयासाठी याच कुंकुवाच्या रंगाने रंगलेले माझ्या हाताचे ठसे तुझ्या छातीवर उमटवीन.
आज माता चोडे चुमीयु रे बाळा
झीलजो बेवड गाल
तेडी तारा मोढाडां माथे
धूवाधार तोप मंडाशे....
अर्थ :- बाळा आज आई तुझ्या गालाचे मुके घेत आहे पण नंतर तुझ्या चेह-या भोवती तोफा फुटतील आणि तोफ गोळे शत्रू वर पडतील.
आज माताजीने गोदमा रे तुंने
हूफ आवे आंठ पाहोर,
ते दी काळी मेघली राते,
वायु ताढा मोतना वाशे...
अर्थ :- आज आईच्या कुशीत तुला खुप बरे वाटेल चांगली झोप ही लागेल पण उद्या युद्धाची काळी रात्र असेल व वारे देखील मृत्यूचे वाहतील यातूनच अखंड सावध राहून तूला मार्ग काढावा लागेल.
आज माताजीने खोळले रे
तारां झोले जय,
ते दी तारे शिर ओशीका
मेलाशे तीर-बंदूका...
अर्थ :- आज आईच्या मांडीवर डोके ठेवून शांत निजला आहेस पण उद्या रणात ही आईची कूस तूला मिळणार नाही तर तिथे तुझ्या भोवती बाण आणि बंदुका असतील.
सुई लेजे, मारा केसरी रे ! तारी
हिंदवाण्यू जोवे वाट,
जागी व्हेलो आव बालुडा !
माने हाथ भेट बांधवा...
अर्थ :- बाळा आज तुझी झोप पुर्ण करून घे कारण उभा हिदुस्थान तुझी वाट बघतो आहे. उद्या लवकर उठून तुला तुझ्या आईचे हिंदवी स्वराज्या चे स्वप्न आहे ते पुर्ण करायचे आहे.
जागी व्हेलो आवजो वीरा !
टीलु माँ ना लोहीनु लेवा !
अर्थ :- माझ्या रक्ताचे कूंकु तुझ्या कपाळाला लावायचे आहे म्हणून लवकर उठून ये....
(सौजन्य : इंटरनेट वरून कॉपी पेस्ट )
बाल शिवबाचा मराठी पाळणा
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा
चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा…
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा…
गाली तील लावून बाळा काजळ घाला
डोळा उंची अंगड घालून त्याच्या पायी
घुंगर वाळा राजस रूपड,
डोही टोपड पाहून सुख गोपाळा
लिंब लोन उतरा गं लवकर दृष्ट लागल बाळा
कौशल्येचा राम जसा हा लाल यशोधेचा…
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा
जो जो रे बाळा..
जो जो रे..
जो जो रे बाळा..
जो जो रे.. जाग रे..
बाळा जाग रे..
ढोल नगारे घुमुद्यात रे झळुद्यात चौघडे
शिवनेरीच्या सदरेवर भगवा झेंडा फडफडे
गडागडाचे चिरे हरपले सह्याद्रीचे कडे
बाळा तुझियासाठी मावळे मर्द मराठे
खडे आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा..
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा
चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा..
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा…
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा
चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा…
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा…
गाली तील लावून बाळा काजळ घाला डोळा
उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगर वाळा
राजस रूपड, डोही टोपड पाहून सुख गोपाळा
लिंब लोन उतरा गं लवकर दृष्ट लागल बाळा
कौशल्येचा राम जसा हा लाल यशोधेचा…
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा
जो जो रे बाळा..
जो जो रे.. जो जो रे बाळा..
जो जो रे.. जाग रे..
बाळा जाग रे..
ढोल नगारे घुमुद्यात रे झळुद्यात चौघडे
शिवनेरीच्या सदरेवर भगवा झेंडा फडफडे
गडागडाचे चिरे हरपले सह्याद्रीचे कडे
बाळा तुझियासाठी मावळे मर्द मराठे खडे
आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा…
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा
चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा..
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा
No comments:
Post a Comment