त्रिंगलवाडी किल्ल्याचा रक्षणकर्ता असलेला मारुतीराया...
इगतपुरी परिसरातील सह्याद्रीच्या रांगेत वसलेला कातळकोरीव सुंदर पण दुर्लक्षित असा किल्ला म्हणजे त्रिंगलवाडी किल्ला. कल्याण, चौल या बंदरातून नाशिकमार्गे मालवाहतूक होणा-या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली गेली. किल्ल्यावर जाण्यासाठी कातळ फोडून पाय-या बनवण्यात आल्या आहेत.पाय-या संपताना वळणावर समोरच्या भिंतीवर ५ फूट उंचीची हनुमानाची भव्य मूर्ती कोरलेली आहे. उजव्या बाजूला कातळात कोरलेली अप्रतिम सुंदर प्रवेशद्वार आहे.
No comments:
Post a Comment