Sunday, 25 April 2021

मारणाऱ्या पेक्षा वाचवणारा श्रेष्ठ असतो

इंडोनेशिया च्या जवळ असलेल्या समुद्रात स्थानिक मच्छीमार मासे पकडायला गेले होते, नेहमी प्रमाणे माश्याचे जाळे टाकायला जात असताना, त्यांना आज एक वेगळा अनुभव येणार होता. त्यांचा नावेशेजारी एका देवमाश्याचे पिल्लू सारखे येत होते, देवमाशाच्या शिकारीवर जगभरात बंदी आहे. त्यामुळे सुरवातीला त्यांनी त्या पिल्लाकडे दुर्लक्ष केले, तरीही ते पिल्लू पुन्हा पुन्हा त्यांच्या बोटी जवळच येत होते. शेवटी त्यांनी बोट थांबवली, तसे त्यांच्या लक्षात आले की या देवमाश्याच्या बाळाला आपली मदत हवी आहे,आणि त्यासाठीच तर ते बोटी जवळ येत आहे. झाले असे होते की, या माशाच्या पूर्ण शरीरावर एक भला मोठ्ठा दोरखंड गुंडाळला गेला होता,ज्यामुळे तो मासा त्याचे पंख हलवू शकत नव्हता, आणि त्याला खोल समुद्रात तळाशी जाता येत नव्हते. शेवटी त्याने मनुष्याला मदतीची विनंती कशी केली, आणि त्यानंतर त्याने आपली शेपटी हलवून सगळ्यांना कसे thanks सुद्धा केले ते नक्की पहाच... शेवटी मारणाऱ्या पेक्षा वाचवणारा श्रेष्ठ असतो!

No comments:

Post a Comment

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....