कुशावर्त तीर्थ, त्र्यंबकेश्वर
Kushavart Tirth, Tryambakeshwar
त्र्यंबकेश्वर परिसरात असंख्य तीर्थकुंड आहेत. कुशावर्त तीर्थ हे त्र्यंबकेश्वरमधील मुख्य तीर्थ मानलं जातं. सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये या कुंडातच नागा साधू शाही स्नान करतात. त्र्यंबकेश्वर ज्योतीर्लिंग मंदिरा पासून अगदी जवळच हे कुंड आहे.
गौतम ऋषींनी गंगेला कुशांनी (दर्भांनी) अडविले म्हणून त्याला कुशावर्त असं नाव पडलं. या कुशावर्त कुंडाचे श्रीमंत होळकर सरकारचे फडणीस, रावजी महादेव पारनेरकर यांनी इ. स. १७६८ मध्ये नुतनीकरण केले. कुशावर्ताभोवती उत्तर, पश्चिम आणि दक्षिण अशा तीन बाजूस ओवऱ्या बांधलेल्या आहेत. या ओवऱ्याच्या चारी कोपऱ्यांवर चार देवालयं आहेत. या तीर्थावर स्नान, दान, श्राद्धादिक करण्यासाठी हे अत्यंत पवित्र स्थान मानलं जातं.
कनखळ तीर्थ हे कुशावर्ताचे पूर्व बाजूला आहे. विष्णू महादेव गद्रे यांनी इ. स.१७८५ मध्ये बांधलं. या तीर्थात दक्षिणेस असलेले कंचनतीर्थ याच वेळेस बांधलं.
Kushavart Tirth kund is a prominent tirth at Tryambakeshwar. It is near to Tryambakeshwar Jyotirling temple. Naga Sadhus perform the shahi bath at Kushavart during Simhastha Kumbh mela.
Sage Gautam blocked the stream of Godavari with the help of Kush (Darbha, a kind of grass) at this place. Therefore, it is known as 'Kushavart Tirth'. It is renovated by Ravji Mahadeo Parnerkar in 1768 AD.
No comments:
Post a Comment